शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

आप सरकारला पोलिसांचे पूर्ण सहकार्य- राजनाथसिंग सुरक्षेला प्राधान्य : राज्यांच्या विकासामुळेच देशाचा विकास शक्य

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नवी दिल्ली : केजरीवाल सरकारला पूर्ण सहकार्य द्या असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

नवी दिल्ली : केजरीवाल सरकारला पूर्ण सहकार्य द्या असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दिल्लीत नवे सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीच्या विकासासाठी मी पोलिसांच्या पूर्ण सहकार्याची अपेक्षा करतो, असे राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांच्या ६८ व्या स्थापनादिनाच्या पथसंचलन कार्यक्रमात म्हटले. कोणत्याही पक्षाचे सरकार असो,राज्यांचा विकास झाल्याखेरीज देशाचा विकास शक्य नाही. सांघिक सहकार्यातून भारताला जागतिक शक्ती बनवायचे असेल तर पक्षभेद बाजूला सारत सर्व राज्यांना पूर्ण सहकार्य द्यायला हवे. हीच बाब पंतप्रधानांनी वेळोवेळी बोलून दाखविली आहे.
-------------------
महिलांवरील अत्याचारामुळे मोदी व्यथित
दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबाबत केले जात असलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. केवळ दिल्लीतील जनतेचीच बाब नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही महिलेबाबत गुन्हा घडला की व्यथित होतात. समाजविघातक घटकांकडून दिल्लीच्या विकासकामांमध्ये बाधा निर्माण केली जाऊ नये यासाठी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत करावी. दिल्लीसारख्या वैविध्यपूर्ण शहरामध्ये सुरक्षेचे काम अतिशय अवघड ठरते. विविध आव्हाने असतानाही दिल्लीचे पोलीस चांगली कामगिरी बजावत आहेत, असे सांगत त्यांनी प्रशंसाही केली.
-------------------------
पोलिसांना प्रतिमा जपण्याचे आव्हान
दिल्लीत वेगवेगळे समुदाय वास्तव्याला असून अगदी छोटी घटनाही राष्ट्रीय बातमी बनते. त्यापेक्षा मोठी घडामोड असेल तर आंतरराष्ट्रीय बातमी बनते. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. प्रतिमा जपण्यासाठी पोलीस दलाने सतर्कपणे काम करावे, असेही ते म्हणाले.