शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पारंपरिक उपचार पद्धतीच्या प्रसारात आपण कमी पडलो

By admin | Updated: May 4, 2017 01:13 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताची पारंपरिक आरोग्य आणि औषधी पद्धती जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आली. कारण

डेहराडून : स्वातंत्र्यपूर्व काळात भारताची पारंपरिक आरोग्य आणि औषधी पद्धती जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आली. कारण आम्ही गुलाम देश होतो. एवढेच नाहीतर स्वातंत्र्योत्तर काळातही एकापाठोपाठ आलेल्या सरकारलाही या वैशिष्ट्यपूर्ण औषधी पद्धतीला उभारी देण्याचा विसर पडला, हे दुर्दैव होय. भारताच्या पारंपरिक चिकित्सा पद्धती आणि योग आदी शास्त्रांना चालना देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात फारसे प्रयत्न झाले नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली.योगगुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वारस्थित पतंजली योगविद्यापीठाच्या संशोधन संस्थेच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चिकित्सालयीन चाचण्या आणि आयुर्वेदिक औषधींच्या अत्याधुनिक आवेष्टणासाठी ही उच्चतंत्रज्ञानयुक्त संशोधन संस्थेची स्थापना करून पतंजली योगविद्यापीठाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आयुर्वेदिक औषधी अत्याधुनिक पद्धतीने आवेष्टित केल्यास जगभरात त्यांचा चढाओढीने स्वीकार केला जाईल. आयुर्वेदाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर जागृती केल्याबद्दल पंतप्रधानांनी बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रशंसाही केली. यावेळी पतंजली योगविद्यापीठाने पंतप्रधान मोदी यांना ‘राष्ट्रऋषी’ उपाधी प्रदान केली. बाबा रामदेव यांनी माझा सन्मान करून मला आश्चर्यचकित केले, असेही मोदी म्हणाले. याचा अर्थ असा की, आमच्या अशा अपेक्षा असून, त्या पूर्ण कराव्यात, असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझा स्वत:वर एवढा भरवसा नाही, तेवढा सव्वाशे कोटी भारतीयांच्या आशीर्वादावर आहे.आचार्य बालकृष्ण यांनी संकलित केलेल्या विश्वकोशाचे (वर्ल्ड हर्बल इनसायक्लोपिडिया) प्रकाशनही केले. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर होत आहे. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासंबंधित प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मंजूर करण्यात यश मिळविल्याबद्दल बाबा रामदेव यांनी मोदी यांना विश्वगुरू म्हणून संबोधले. यावेळी आचार्य बालकृष्ण यांनी संकलित केलेल्या विश्वकोशाचे (वर्ल्ड हर्बल इनसायक्लोपिडिया) प्रकाशनही केले. राज्यपाल के.के. पॉल, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आदी उपस्थित होते.मोदींनी घेतले केदारनाथाचे दर्शनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडस्थित आठव्या शतकातील जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिरात पूजा आणि रुद्राभिषेक करून बाबा केदरानाथांचे दर्शन घेतले.  बुधवारी सकाळी ८.३० वाजता मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडण्यात आल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी दर्शन घेतले. त्यांनी जवळपास २० मिनिटे पूजा केली. व्ही.पी. सिंह यांच्यानंतर २८ वर्षांनंतर केदारनाथला भेट देणारे मोदी हे भारताचे तिसरे पंतप्रधान होत. मंदिर परिसरात सकाळपासून भक्त आणि स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली होती. मोदी यांनी हात उंचावत त्यांना अभिवादनही केले.