शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

योगींचे राज्यारोहण!

By admin | Updated: March 20, 2017 04:06 IST

कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेले भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ (४४) यांनी रविवारी येथे उत्तर प्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ

लखनौ : कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेले भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ (४४) यांनी रविवारी येथे उत्तर प्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राम नाईक यांनी केशव प्रसाद मौर्य व डॉ. दिनेश शर्मा यांना उप मुख्यमंत्रिपदाची, तर एकूण ४७ जणांना मंत्रिपदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी टिष्ट्वटरद्वारे आदित्यनाथ यांचे आणि त्यांच्या मंत्र्यांचे अभिनंदन केले आणि उत्तर प्रदेशचे उत्तम प्रदेश होईल, अशी ग्वाहीही दिली. झुकते माप : मंत्रिमंडळात पूर्वांचलला झुकते माप देण्यात आले असून, या भागातील १७ आमदारांना मंत्रिपद दिले आहे.

राजनाथ पुत्राला जागा नाही- नोएडा येथून विजयी झालेले राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही.यूपीत एकच मुस्लीम चेहराआदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एकाच मुस्लीम चेहऱ्याला जागा मिळाली आहे. मोहसीन रजा यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. ते भाजपाचे प्रवक्ता आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लीम चेहऱ्याला उमेदवारी दिली नव्हती. भेदभावाचे नाही विकासाचे राजकारणसोहळ्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्वांचा विकास करणार, भेदभाव करणार नसल्याचे स्पष्ट केले. सर्व मंत्र्यांना १५ दिवसांमध्ये संपत्ती जाहीर करण्याचे आदेशही देऊन, पारदर्शकतेचा केंद्रीय पायंडा यूपीत सुरू केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांचा विकास, यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.