शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

योगी मोदींपेक्षा श्रेष्ठ, त्यांनी पंतप्रधान व्हावे- रामू

By admin | Updated: March 26, 2017 17:05 IST

वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत राहणा-या राम गोपाल वर्मांनी पुन्हा एकदा खळबळजनक ट्विट केलं आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत राहणा-या राम गोपाल वर्मांनी पुन्हा एकदा खळबळजनक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तुलना केली आहे. रामू ट्विटमध्ये म्हणाले, योगी आदित्यनाथ विलक्षण आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. मला आशा आहे की ते नक्कीच पुढचे पंतप्रधान होतील. तसेच दुस-या एका ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही लक्ष्य केलं आहे. ट्रम्प जे काही प्राप्त करतील अथवा नाही ते मीडिया सुनिश्चित करेलच. तरीही अमेरिकेच्या राजकीय इतिहासात मोठा विनोद म्हणून ट्रम्प ओळखले जातील, असंही वादग्रस्त ट्विट रामूनं केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महिला दिनी अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख करत केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचा वाद क्षमत नाही तोच आणखी एक ट्विट करून राम गोपाल वर्मानं लोकांची नाराजी ओढवून घेतली होती. होळीच्या शुभेच्छा देताना त्याची संकुचित मनोवृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. वर्षातला हा एकमेव असा सण आहे की जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहण्याची मज्जा लुटू शकतात. तसेच एकमेकांना स्पर्श करू शकतात. कोणत्या देवानं कोणत्या राक्षसाचा वध केला हे मला माहीत नाही, मात्र असे बोल्ड क्षण ज्या राक्षसांमुळे निर्माण झाले आहेत त्यांचे मी आभार मानतो, असंही रामू म्हणाला होता.'महिला दिनी' त्यांनी वादग्रस्त ट्विट करण्याची परंपरा कायम ठेवली होती. 'हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीचा आदर्श समोर ठेवा आणि पुरुषांना आनंद द्या' असा अजब सल्ला रामूने महिलांना दिला होता. एवढेच नव्हे तर ' महिला दिनाला पुरुष दिन म्हणावे कारण महिलांपेक्षा पुरुषच हा दिवस जास्त साजरा करतात,' असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.