शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

योगी आदित्यनाथ आणि त्यांची 10 वादग्रस्त वक्तव्यं

By admin | Updated: March 18, 2017 19:27 IST

योगी आदित्यनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा अनेकदा अडचणीत सापडली असून विरोधकांना भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - भारतीय जनता पक्षाने योदी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गजांची नावे होते. मात्र सकाळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ यांना विशेष विमानाने दिल्लीला बोलावलं तेव्हाच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जाऊ लागलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी भाजपाचा फायर ब्रँण्ड नेता म्हटलं जातं. त्यांना हिंदुत्वाचा चेहरादेखील मानलं जातं, त्यांचं राजकारणही हिंदुत्वाच्या बाजूनेच चालू असतं. अयोध्येत राम मंदिर उभं करणं हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. योगी आदित्यनाथ रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. 
 
मात्र या सर्वांच्या पलीकडे योगी आदित्यनाथ आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील ओळखले जातात. योगी आदित्यनाथ नेहमी असं काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत असतात ज्यामुळे नेहमी चर्चेत असतात. योगी आदित्यनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा अनेकदा अडचणीत सापडली असून विरोधकांना भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या अशाच काही वादग्रस्त वक्तव्यांची माहिती घेऊयात.
 
1) लव्ह जिहाद -
2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ समोर आली होता. या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ समर्थकांना सांगत होते की, 'जर त्यांनी एका हिंदू मुलीचं धर्मांतरण केलं, तर आम्ही 100 मुस्लिम मुलींचं धर्मांतरण करु'.
 
2) मुस्लिमबहुल भागात जास्त दंगली - 
मुस्लिमबहुल भागात जास्त दंगली घडत असून ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये अन्य धर्मियांना स्थान दिले जात नाही असे वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने जोरदार टीका केली होती. 
 
3) योगासनांना विरोध करणा-यांनी भारत सोडावा - 
योगासनांना विरोध करणा-यांनी देश सोडावा, असं वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. 'जे लोक सूर्यनमस्कार मानत नाहीत त्यांनी समुद्रात बुडलं पाहिजे किंवा अंधा-या खोलीत जीवन व्यतीत केलं पाहिजे. सूर्य कधीही प्रकाश आणि उर्जा देताना भेदभाव करत नाही, मग ज्यांना सूर्याला नमस्कार करायचा नाही त्यांनी स्वत:ला अंधारात कोंडून घ्यावे. असे लोक भारताची प्रतिष्ठा धुळीत मिळवत आहेत', असे आदित्यनाथ यांनी म्हटले होते. 
 
4) बाबरी मशीद तोडण्यापासून नाही रोखू शकले, मग राम मंदिर बांधण्यापासून कोण रोखेल - 
 'राम मंदिर बनवण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जेव्हा वादग्रस्त बांधकाम तोडण्यापासून कोणी रोखू  शकलं नाही, तर मग मंदिर बनवण्यापासून कोण रोखेल ? 6 डिेसेंबरला कारसेवकांनी बांधकाम तोडल्यानंतर विटेचा एक-एक तुकडा आपल्यासोबत नेला होता. आणि आपल्याला हवा तसा वापरला होता', असं योगी आदित्यनाथ बोलले होते. योगी आदित्यनाथ यांनी रामकथेवर आधारित कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
 
5) अनुपम खेर रिअल लाईफमध्येही 'खलनायक' - 
' आपण फक्त चित्रपटाच्या पडद्यावर नव्हे तर ख-या आयुष्यातही खलनायक आहोत हे अनुमप खेर यांनी सिद्ध केले आहे' अशी घणाघाती टीका योगी आदित्यनाथ यांनी केली होती. अनुपम खेर यांनी भाजपातील वाचळवीरांवर टीका करत पक्षाने त्यांच्यावर अकुंश ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले होते.  'भाजपामध्ये योगी, साध्वी असे काही नेते आहेत, ते बकवास करतात, त्यांना तुरुंगात टाकायला हवं, त्यांना पक्षातूनही हाकलायला हवं' असे वक्तव्य खेर यांनी  केले होते. 
 
6) जेएनयूमध्ये अजून एक मोहम्मद अली जिन्ना जन्मू देणार नाही -
'जेएनयूमध्ये अजून एक मोहम्मद अली जिन्ना जन्मू देणार नाही, आणि जर झाल्यास त्याला दफन करुन टाकू. आम्ही देशद्रोहींविरोधात सक्त आहोत' असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मतदारसंघात प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं होतं. 
 
7) मुस्लिमांच्या भारतप्रवेशाला मज्जाव करा - 
सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेवर चहुबाजूनंही टीकेची झोड उठत असताना, योगी आदित्यनाथ यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले होते.  दहशतवाद रोखण्यासाठी आपल्या देशातही अशाप्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले. 
 
8) मुलींच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणरेषा ओढणार - 
'तरुणी आणि महिलांच्या छेडछाडी आणि अपहरणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पश्चिम उत्तरप्रदेशात या घटनांचं प्रमाण जास्त आहे. आपल्या मुली, महिला आणि हिंदुत्वाच्या सुरक्षेसाठी पुर्व उत्तरप्रदेशप्रमाणे येथेही आम्ही लक्ष्मणरेषा ओढू', असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं.
 
9) मशिदीत गौरी - गणेश मुर्तीची स्थापना करु - 
फ्रेब्रुवारी 2015 मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलले होते की, 'जर मला परवानगी मिळाली तर देशातल्या सर्व मशिदींमध्ये गौरी - गणपतीच्या मुर्तीची स्थापना करेन'.
 
10) शाहरुख खानची हाफिज सईदशी तुलना - 
नोव्हेंबर 2015 रोजी योगी आदित्यनाथ यांनी शाहरुख खानची तुलना दहशतवादी हाफिज सईदशी करत शाहरुख आणि हाफिजच्या भाषेत जास्त अंतर नसल्याचं म्हटलं होतं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर देशातील वातावरण खराब करण्यासाठी कट रचला जात असून शाहरुखही त्यात सामील असल्याचं म्हटलं होतं. देशातील बहुसंख्यांक लोकांनी जर शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला नाही तर आपण रस्त्यावर उतरु असंही ते बोलले होते.