शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

योगेंद्र यादव, भूषण यांचा नवा पक्ष

By admin | Updated: January 20, 2016 03:16 IST

आम आदमी पार्टीतून हकालपट्टी झालेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे नेतेद्वय नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करीत असून २०१७ मध्ये पंजाबमध्ये

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतून हकालपट्टी झालेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे नेतेद्वय नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करीत असून २०१७ मध्ये पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवू शकतात. आपमधून बडतर्फीनंतर उभय नेते आणि त्यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या स्वराज अभियानाने पंजाब विधानसभा निवडणुका लढविण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. स्वराज अभियानच्या एका ज्येष्ठ नेत्याने मंगळवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, लवकरच एक राजकीय पक्ष स्थापन करण्याची आमची इच्छा आहे. अर्थात याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दरम्यान, अभियानने खादूर साहिब विधानसभा मतदारसंघात पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीत संगीतकार भाई बलदीपसिंग यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वराज अभियान ही एक अराजकीय संघटना आहे आणि आम्ही पुढील महिन्यापर्यंत नवा पक्ष स्थापन करण्याचीही शक्यता नाही. भाई बलदीपसिंग हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असून स्वराज अभियान त्यांना संपूर्ण पाठिंबा देईल, असे या नेत्याने स्पष्ट केले.दुसरीकडे आपने विधानसभा निवडणुकांमध्ये विजयासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. गेल्या आठवड्यातच आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात विशाल सभेला संबोधित केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)