शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘हो, हे शक्य आहे’ मनसेची ब्लू प्रिंट आज

By admin | Updated: September 25, 2014 04:16 IST

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू, असे आवाहन करीत आपल्या स्वप्नातील महाराट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्या सभेत केली

मुंबई : जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू, असे आवाहन करीत आपल्या स्वप्नातील महाराट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्या सभेत केली. मात्र, त्यानंतर आठ वर्षे ‘कुठेय ब्ल्यू प्रिंट’ या प्रश्नाचे उत्तर देताना मनसेची स्थिती अवघड झाली होती. अखेर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्ल्यू प्रिंट सादर होत आहे. षण्मुखानंद सभागृहात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ही ब्ल्यू प्रिंट सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मनसे कामाला लागली असून सोशल मीडियात कलात्मक फोटो आणि व्हिडीओ क्लीप अपलोड करण्यात येत आहे. ‘हो, हे शक्य आहे’ अशी टॅगलाईनही या विकास आराखड्यासाठी बनविली आहे. या माध्यमातून राज ठाकरे काय कार्यक्रम देतात, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर मनसे काहीशी बाजूला गेल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होऊनही पक्षात शांतता आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रकाशित होणाऱ्या या आराखड्याच्या माध्यमातून राज विधानसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची शक्यता असल्याने मनसैनिकांमध्ये ते काय बोलणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे.