शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पावसाळा नेहमीसारखाच; निराशेचे ढग दूर

By admin | Updated: June 7, 2015 23:26 IST

भारतीय हवामान खात्याने यंदाचा पाऊस सर्वांचीच निराशा करील असे भाकीत वर्तवले असतानाच ‘स्कायमेट’ या हवामानविषयक खासगी कंपनीने मात्र हे निराशेचे ढग दूर करणारी वार्ता दिली.

नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने यंदाचा पाऊस सर्वांचीच निराशा करील असे भाकीत वर्तवले असतानाच ‘स्कायमेट’ या हवामानविषयक खासगी कंपनीने मात्र हे निराशेचे ढग दूर करणारी वार्ता दिली. यंदा पावसाळा नेहमीसारखा राहील, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.‘स्कायमेट’ने मान्सूनवर प्रभाव टाकणाऱ्या अल-निनोला फारसे महत्त्व न देता, यावर्षी अल-निनोचा परिणाम राहणार नसल्याचे म्हटले आहे. प्रशांत महासागराच्या तळाशी निर्माण होणाऱ्या अल-निनो या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे जगाच्या विविध भागात पूर आणि अवर्षणाची स्थिती संभवते. याच अल-निनोच्या आधारे हवामान खात्याने यंदा कमी पाऊस पडण्याचे भाकित वर्तवले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)> ‘स्कायमेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंह यांनी आपल्या संकेतस्थळावरील ब्लॉगमध्ये यंदा पावसाळा नेहमीसारखाच राहील, असे भाकीत वर्तवले आहे. अल-निनो जर सलग दोन वर्षे वाहत असेल तर त्याच्यामुळे अवर्षणाची शक्यता केवळ पहिल्या वर्षीच संभवते. दुसऱ्या वर्षी त्याचा प्रभाव फारसा जाणवत नाही. अल-निनोचे २०१५ हे सलग दुसरे वर्ष आहे. त्यामुळे या वर्षात याचा प्रभाव जाणवणार नाही आणि पावसाळा सामान्य असेल.> गत १४० वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळ केवळ चार वेळा (१९०४-०५, १९६५-६६, १९८५-८६-८७) पडला आहे. म्हणूनच अल-निनो आहे म्हणून दुष्काळ पडणारच असे मानणे अयोग्य आहे, असेही सिंह यांनी म्हटले आहे.> हिंदी महासागर द्विध्रुव (आयओडी) अनुकूल आहे आणि भारतात मान्सूनची स्थिती अनुकूल असण्यास मदत होणार आहे, असेही ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.> आयओडी अनुकूल असल्यास अल-निनोचा प्रभाव कमी होतो. १९९७ मध्ये अल-निनो शक्तिशाली होते; मात्र याउपरही अनुकूल आयओडीमुळे देशात सरासरी १०२ टक्के पाऊस पडला होता. > एकंदर आयओडी अनुकूल असल्यास तो अल-निनोच्या प्रभावापासून रक्षण करतो. नेमके हेच यंदा भारताबाबत घडणार असल्याचेही ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.