यासिन मलिक मसरत आलम स्थानबद्ध निदर्शनस्थळी जाण्यास मज्जाव : युवकाच्या मृत्यूनंतर तणाव
By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST
श्रीनगर : जम्मू-काश्मिरात लष्करी मोहिमेत ठार झालेल्या दोघांपैकी एकजण अतिरेकी नसल्याचा दावा करीत संतप्त जमावाने निदर्शने चालविली असता त्या स्थळी जात असलेले फुटीरवादी नेते मोहम्मद यासिन मलिक आणि मसरत आलम भट या दोघांना पोलिसांनी मधेच रोखत ताब्यात घेतले. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात युवकाच्या मृत्यूनंतर तणाव पसरला असून जमावाने दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला असता सहाजण जखमी झाले. जेकेएलएफचा प्रमुख असलेला मलिक आणि मसरत आलम या दोघांना अवंतीपोरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कस्टडीत ठेवले आहे. या भागातील परिस्थिती पाहता या दोघांशी संलग्न अनेक नेत्यांची धरपकड सुरू आहे.
यासिन मलिक मसरत आलम स्थानबद्ध निदर्शनस्थळी जाण्यास मज्जाव : युवकाच्या मृत्यूनंतर तणाव
श्रीनगर : जम्मू-काश्मिरात लष्करी मोहिमेत ठार झालेल्या दोघांपैकी एकजण अतिरेकी नसल्याचा दावा करीत संतप्त जमावाने निदर्शने चालविली असता त्या स्थळी जात असलेले फुटीरवादी नेते मोहम्मद यासिन मलिक आणि मसरत आलम भट या दोघांना पोलिसांनी मधेच रोखत ताब्यात घेतले. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात युवकाच्या मृत्यूनंतर तणाव पसरला असून जमावाने दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला असता सहाजण जखमी झाले. जेकेएलएफचा प्रमुख असलेला मलिक आणि मसरत आलम या दोघांना अवंतीपोरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कस्टडीत ठेवले आहे. या भागातील परिस्थिती पाहता या दोघांशी संलग्न अनेक नेत्यांची धरपकड सुरू आहे.संघर्षात सहा जखमी : जमावाकडून दगडफेकदरम्यान, संतप्त जमावाने केलेल्या निदर्शनांच्या वेळी संघर्षात किमान सहाजण जखमी झाले. सोमवारी लष्करी मोहिमेत ठार झालेला खलिद मुझफ्फर हा अतिरेकी नसल्याचा दावा करीत शेकडो नागरिकांनी रस्त्यावर येत निदर्शने केल्यामुळे तणाव निर्माण झाला. लष्कराने ठार झालेला युवक अतिरेकीच असल्याचे सांगत भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. जंगलभागात शोधमोहीम पार पाडण्यात आली असता हिज्बुल मुजाहिदीनचा अतिरेकी युनिस अहमद गनी या अतिरेक्याचा मृतदेह आढळून आला. ठार झालेल्या मुझफ्फरचा मृतदेह त्राल येथे आणण्यात आला असता शेकडो नागरिकांनी दगडफेक केल्याने सुरक्षा दलाने अश्रुधूर आणि पेलेट गनचा मारा करीत त्यांना पिटाळून लावले. त्यावेळी धावपळीत सहाजण जखमी झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले.----------------------तो हिज्बुलचा भूमिगत कार्यकर्ताबनावट चकमकीत ठार झालेला युवक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी नसल्याचा दावा निदर्शकांनी केला असला तरी लष्कराने त्याच्याकडे दोन एके रायफली आढळल्याचे सांगत तो हिज्बुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा भूमिगत कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. सोमवारी बुचू जंगलभागात सुरक्षा दलाच्या गस्त पथकावर दोन अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा लष्कराच्या प्रवक्त्याने केला आहे. ८ ऑगस्ट रोजी पोलिसांकडून हिसकावून नेण्यात आलेली एक रायफल मुझफ्फरकडे आढळल्याने तो अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठाम दावा लष्कराने केला आहे.