शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

यासिन भटकळची भिस्त ‘इसिस’वर!

By admin | Updated: July 5, 2015 03:13 IST

देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या आरोपावरून अटक होऊन सध्या अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेच्या हैदराबाद येथील चेर्लापल्ली मध्यवर्ती

नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या आरोपावरून अटक होऊन सध्या अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेच्या हैदराबाद येथील चेर्लापल्ली मध्यवर्ती कारागृहात असलेला ‘इंडियन मुजाहिदिन’चा म्होरक्या यासिन भटकळ याने ‘दमास्कसमधील मित्रांच्या मदतीने’ लवकरच आपण तुरुंगातून बाहेर येऊ, असे पत्नीला मोबाइलवरून फोन करून सांगितल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर संस्थांना मिळाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भटकळने तुरुंगातून मोबाइलवरून किमान १० वेळा बाहेरच्या व्यक्तींना फोन केले असून, त्याची फोनवरील ही सर्व संभाषणे ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने (आयबी) ‘टॅप’ करून त्याची माहिती हैदराबादमधील अधिकाऱ्यांना दिली आहे. दिल्लीत राहणाऱ्या पत्नीला केलेल्या या धक्कादायक फोनखेरीज भटकळने इतर राज्यांमध्येही अनेक व्यक्तींना फोन केले होते; पण त्या व्यक्तींशी संभाषण होऊ शकले नव्हते.भटकळची पत्नी झाहिदा आग्नेय दिल्लीतील जामिया नगरमध्ये राहते. तिला केलेल्या फोनवरील जे संभाषण ‘आयबी’ने ‘टॅप’ केले त्यात भटकळ तिला असे सांगताना ऐकू येते: ‘ अल्ला ताले के मर्जी से जल्दी ही निकल जाऊंगा. मै निकल जाऊंगा मेरे दमास्कसवाले दोस्तों के मदद से. फिर निकलने के बाद, हम जल्दी ही दमास्कस पहूँच जायेंगे.’दमास्कस ही सीरियाची राजधानी आहे व कट्टर इस्लामी ‘खिलाफत’ स्थापन करण्याचा चंग बांधलेल्या ‘इस्लामिक स्टेट आॅफ सीरिया अँड इराक’ने (इसिस) सीरियामध्ये घट्ट पाय रोवून तेथील फार मोठ्या भूप्रदेशावर कब्जा करून तेथे आपले प्रशासन लागू केले आहे. सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी असे मानतात की, भटकळच्या या संभाषणातील दमास्कसचा संदर्भ ‘इसिस’शी आहे. किंबहुना गुन्हेगारी जगतातील सांकेतिक भाषेत ‘इसिस’साठी वापरला जाणारा तो पर्यायी शब्द आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)‘हमारी जेल मे नामुमकीन...’तेलंगण सरकारच्या कारागृह विभागाने शनिवारी सायंकाळी एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून भटकळने हा फोन चेर्लापल्ली तुरुंगातून करणे सर्वस्वी अशक्य असल्याचा ठाम दावा करण्यात आला. त्यात म्हटले की, न्यायालयाच्या आदेशानुसार भटकळला तुरुंगातील अधिकृत फोनवरूनच पत्नी व आईला फोन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.यासाठी भटकळकडून टेलिफोन क्रमांक घेण्यात आले व त्यांची ‘आयबी’ आणि ‘एनआयए’कडून खात्री करून घेण्यात आली. आत्तापर्यंत भटकळने अशा प्रकारे २७ वेळा केलेल्या फोनवरील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले आहे. हे वृत्त आल्यानंतर शनिवारी ती संभाषणे पुन्हा पूर्णपणे ऐकण्यात आली; पण त्यात ‘इसिस’ किंवा दमास्कसचा कुठेही उल्लेख नाही.10वेळा भटकळने तुरुंगातून मोबाइलवरून किमान बाहेरच्या व्यक्तींना फोन केले असून, त्याची फोनवरील ही सर्व संभाषणे ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने (आयबी)ने ‘टॅप’ करून त्याची माहिती हैदराबादमधील अधिकाऱ्यांना दिली आहे. -‘इसिस’च्या सोशल मीडियावरून कट्टर धर्मवेडाचे भूत डोक्यात भरलेले भारतातील अनेक तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी लढण्याकरता गुपचूप देश सोडून तिकडे गेल्याची उदाहरणे याआधी घडली आहेत. भटकळच्या उपरोक्त संभाषणाची माहिती खरी असेल तर ती सुरक्षा यंत्रणांनी याआधी दिलेल्या इशाऱ्यांना बळकटी देणारी आहे.-हैदराबादचे चेर्लापल्ली मध्यवर्ती कारागृह कडक सुरक्षा व्यवस्थेसाठी ओळखले जात असले तरी तेथील कैद्यांकडून मोबाइल फोन, सिम कार्ड व पेन ड्राईव्ह हस्तगत केल्या गेल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. आयबीचे लक्षभटकळचे झाहिदाशी २००८मध्ये लग्न झाले. त्यानंतर अल्पावधीच तो पत्नीपासून वेगळा राहत असला तरी तो तिच्याशी नेहमी संपर्कात असतो असे समजते. तेहसीन उर्फ मोनूच्या माध्यमातून यासिन भटकळने १ लाख रुपये व मोबाइल फोन पत्नीला पोहोचविल्याचे आॅगस्ट २०१३मध्ये कळल्यापासून ‘आयबी’चे गुप्तहेर त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भटकळला ज्या कडक सुरक्षेच्या कोठडीत ठेवले आहे तेथून त्याने मोबाइलवरून फोेन केला असणे सर्वस्वी अशक्य आहे. पण न्यायालयात नेतात तेव्हा कैद्यांवर तुरुंग व्यवस्थापनाचे नियंत्रण नसते. त्यामुळे अशा एखाद्या वेळी भटकळने हा फोन केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही आम्ही सतर्कता वाढविली असून तुरुंग परिसर ‘सॅनिटाईज’ करण्यात आला आहे.- व्ही.के. सिंग, कारागृह महासंचालक, तेलंगण