धनश्री लेकुरवाळेला युवा भूषण पुरस्कार
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
फोटो - स्कॅन
धनश्री लेकुरवाळेला युवा भूषण पुरस्कार
फोटो - स्कॅननागपूर : वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून विदर्भाचा लौकिक राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर वाढविणाऱ्या विद्यार्थी व युवकांना नागभूषण अवार्ड फाऊंडेशनतर्फे युवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्कार स्वरूपात ५० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी धनश्री सुधीर लेकुरवाळे हिची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योगपटू म्हणून तिने देशभरात नावलौकिक मिळविला आहे.