शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

याकुबला फासावर लटकवा... पिडीत कुटुंबियांचा आवाज : दादरमध्ये स्वाक्षरी मोहीम अवघ्या तीन तासांत तीन हजार नागरीकांचा पाठिंबा

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

याकुबला फासावर लटकवा...

याकुबला फासावर लटकवा...
पिडीत कुटुंबियांचा आवाज : दादरमध्ये स्वाक्षरी मोहीम
अवघ्या तीन तासांत तीन हजार नागरीकांचा पाठिंबा
मुंबई : वयाच्या तेराव्या वर्षी १९९३च्या बॉम्ब स्फोट मालिकेत आईला गमावणार्‍या तुषार देशमुख या तरूणाला याकुब मेमनला फासावर लटकव या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागले. मंगळवारी तुषारने शिवाजी पार्क परिसरात याकुबच्या फाशीसाठी स्वाक्षरी मोहिम राबवली. अवघ्या काही तासात हजारो नागरिकांनी त्यावर सही करून याकुबला या टप्प्यावर कोणतीही दया न दाखवता फासावर लटकवा ही तुषारची भुमिका मान्य केली.
दादर परिसरात तुषार आई वडीलांसह रहायचा. १२ मार्च १९९३चा दुर्दैवी दिवस त्याच्या आयुष्यात आला आणि त्याचे सारे जीवनच विस्कळीत झाले. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना आईने दिलेला जेवणाचा डब्बा अखेरचा ठरला. आई महालक्ष्मी येथील जिंदाल कॅन्टीनमध्ये काम करत होती. त्या दिवशी ती कामावर गेली ती परत आलीच नाही. मी शाळेतून घरी आलो आणि आईची वाट पाहात बसलो. पण दुसर्‍या दिवशी आईचा मृतदेहच घरी आला...डोळयांमधून ओघळणारे अश्रु पुसत पुसत तुषार तो काळ सांगत होता.
आई गेल्याने जबरदस्त धक्का बसला होता. त्यातून सावरतो न सावरतो तोच बाबांनी दुसरा धक्का दिला. त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या नव्या संसारात मी कुठेच नव्हतो. वडील असूनही मी अनाथ झालो होतो. तेव्हा शेजारी राहाणार्‍या योगेश म्हात्रे या मित्राने मला आसरा दिला. योगेशच्या आईने मला पंखाखाली घेतले, मुलासारखा सांभाळ केला, तुषार पुढे सांगत होता.
बॉम्बस्फोट घडवून माझे आयुष्य उध्वस्त करणार्‍या आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली. याकुब त्यापैकीच एक. शिक्षा ठोठावून ८ वर्षे लोटली तरी शिक्षेची अमलबजावणी होती नव्हती. माझ्याप्रमाणेच अनेक कुटुंबे त्या अमलबजावणीची वाट पाहात होते. अखेर तो दिवसही ठरला. पण या टप्प्यावर याकुबला फासावर लटकावू नका, त्याला दया दाखवा असा गळा काहींनी काढला. समोर आलेल्या पुराव्यांनुसार याकुबला टाडा न्यायालयाने फाशी ठोठावली. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही ती कायम केली. असे असताना फाशीचा विरोध करणे म्हणजे देशाच्या न्यायव्यवस्थेचा अपमान करण्यासारखे आहे. शिवाय याकुबला दया दाखवल्यास त्या बॉम्बस्फोटांमध्ये ठार-जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांच्या भावनांचाही घोर अपमान आहे, असेही तुषार सांगतो.
बॉम्बस्फोट मालिका घडविण्यासाठी लागणारे साहित्य असो अथवा आरोपींना पैसा पुरविण्याचे काम याकुबने केले. जर त्याने हे काम केलेच नसते तर बॉम्बस्फोट मालिका घडली नसती. त्यामुळे याकुबला फाशी झालीच पाहीजे, असे त्याचे म्हणणे आहे. यासाठी शिवाजी पार्क परीसरात सायंकाळी पाच वाजल्यापासुन त्याने स्वाक्षरी मोहीम राबविली. या मोहीमेला तब्बल तीन तासांत तीन हजाराहून अधिक नागरीकांनी पाठिंबा दिला.

राज्यपालांकडे सादर केल्या सह्या
मंगळवारी त्याने हा अहवाल राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे सादर केला. मुळात या माध्यमातून मी जनतेचा आवाज राज्यपालांकडे पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते यावर काय भूमिका घेतात हे याकडे माझ्यासोबत सर्वांचेच लक्ष लागले आहे, असे तुषार सांगतो.