शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ वटहुकूम चुकीचा; तरी स्थगिती नाहीच!

By admin | Updated: July 15, 2016 02:35 IST

वैद्यकीय शाखेच्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशपातळीवरील ‘नीट’ परीक्षेची सक्ती केंद्र सरकारने वटहुकूम काढून यंदाच्या वर्षासाठी शिथिल करणे

नवी दिल्ली : वैद्यकीय शाखेच्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशपातळीवरील ‘नीट’ परीक्षेची सक्ती केंद्र सरकारने वटहुकूम काढून यंदाच्या वर्षासाठी शिथिल करणे अयोग्य असले तरी आता यात हस्तक्षेप केल्याने आधीच झालेल्या गोंधळात आणखी भर पडेल, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने या वटहुकुमास अंतरिम स्थगिती देण्यास गुरुवारी नकार दिला.प्रत्येक राज्याने आपापली स्वतंत्र परीक्षा घेऊन वैद्यकीय प्रवेश देण्यापेक्षा हे प्रवेश संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच ‘नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) घेऊन देण्यास केंद्र सरकारनेच तयारी दर्शविल्यानंतर न्यायालयाने यंदापासूनच ‘नीट’नुसार प्रवेश देण्याचा आदेश ९ मे रोजी दिला होता. परंतु नंतर अनेक राज्यांनी पुढे केलेल्या व्यवहार्य अडचणींचे कारण देत केंद्र सरकारने पवित्रा बदलला व वटहुकूम काढूून यंदापुरती ‘नीट’च्या सक्तीत सूट दिली.मध्य प्रदेशातील ‘व्यापमं’ घोटाळा बाहेर काढणारे सामाजिक कार्यकर्ते आनंद राय यांनी केलेली या वटहुकुमास आव्हान देणारी याचिका मूळ आदेश देणाऱ्या न्या. अनिल आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे आली तेव्हा, सरकारने अशा प्रकारे वटहुकूम काढून स्वत:च न्यायालयाकडून घेतलेल्या आदेशास बगल देणे चुकीचे आहे, असे न्यायमूर्तींनी सुनावले. तरीही प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन खंडपीठाने वटहुकुमाला स्थगिती देण्यास नकार दिला. ‘नीट’ परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २४ जुलै रोजी व्हायची आहे. त्याची प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना पाठविण्यात आली आहेत व विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत.