शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कुस्त्यांच्या आखाड्याने फेडले पारणे

By admin | Updated: September 8, 2016 01:34 IST

अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेली पाच दिवस सुरू असलेला श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता कुस्त्यांच्या भव्य आखाड्याने झाली.

ओझर : अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेली पाच दिवस सुरू असलेला श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता कुस्त्यांच्या भव्य आखाड्याने झाली. कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांची पारणे फेडतील अशा नामवंत मल्लांनी कुस्त्या केल्या. पुणे, सोलापूर, नगर, मुंबई, सातारा जिल्ह्यांतील नामवंत मल्लांनी या आखाड्यास हजेरी लावली. ओझर आणि परिसरातील शिरोली बुद्रुक, खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी, हिवरे बुद्रुक, खुर्द, आदी पंचक्रोशीतील गावातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आखाड्यास गर्दी केली होती. आखाड्याचे लिलावदार प्रकाश मांडे, गणपत कवडे, गजानन रवळे, पागोट्याचे उत्तम कवडे व पानसुपारीचे गजानन कवडे, आनंद टेंभेकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आखाड्यात पंच म्हणून किसन मांडे, भास्कर कवडे, हर्षल कवडे, मंगेश मांडे, लक्ष्मण टेंभेकर, पांडुरंग कवडे यांनी काम पाहिले. राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके, सभापती रघुनाथ लेंडे, शिरीष बोऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, जिल्हा युवासेना प्रमुख गणेश कवडे, पंचायत समिती सदस्य गणपत कवडे आदी मान्यवरांच्या हस्ते मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. आखाड्याचे समालोचन देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, माजी अध्यक्ष नावनाथशास्त्री कवडे, माजी सरपंच जगन्नाथ कवडे यांनी केले.यात्रोत्सवाचे नियोजन विघ्नहर गणपती देवस्थानने केले. या नियोजनामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिवनेरभूषण विठ्ठलबाबा मांडे, सरपंच अस्मिता कवडे, रेखा धादवड, उपसरपंच समीर मांडे, सुरेश टेंभेकर, देवस्थानचे सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त बबन मांडे, शंकर कवडे, विक्रम कवडे, बाळासाहेब कवडे, पी. बी. जगदाळे, देविदास कवडे, प्रकाश मांडे, साहेबराव कवडे, अनिल मांडे, ज्ञानेश्वर कवडे, शारदा टेंभेकर, देवस्थानचे व्यवस्थापक अशोक घेगडे, पांडुरंग कवडे, गणेश टेंभेकर, कर्मचारी वर्ग आदी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. (वार्ताहर)