शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

व्याप्त काश्मिरातील पाकचे क्रौर्य बघेल जग

By admin | Updated: October 2, 2015 23:52 IST

पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) पाकिस्तानचा निर्दयीपणा दाखविणाऱ्या चित्रफितीने या देशाचे लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयचा पर्दाफाश झाला आहे

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) पाकिस्तानचा निर्दयीपणा दाखविणाऱ्या चित्रफितीने या देशाचे लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयचा पर्दाफाश झाला आहे. पाकव्याप्त काश्मिरातील भीषण वास्तव आता सारे जग बघू शकेल, असे प्रतिपादन भारतातर्फे शुक्रवारी करण्यात आले. व्हिडिओतील दृश्यांसोबत छेडछाड करण्यात आली आहे आणि भारतीय माध्यमांचा हा अपप्रचार आहे हे पाकिस्तानने केलेले दोन्हीही आरोप वरिष्ठ सरकारी सूत्रांनी फेटाळून लावले. प्रत्येक बाबतीत भारतावर आरोप थोपण्याची पाकिस्तानची खेळी सर्वश्रुत आहे आणि कॅमेरा कधी खोटे बोलत नाही, असा दावा या सूत्रांनी केला. या आठवड्याच्या प्रारंभी उघडकीस आलेल्या या व्हिडिओत पाकिस्तानी अधिकारी मुजफ्फराबाद, गिलगिट आणि कोटलीसह पीओकेतील अनेक भागात सरकारविरुद्ध निदर्शने करणाऱ्या लोकांवर अत्यंत निर्दयीपणे कारवाई करताना दिसत आहेत. पाक लष्कर आणि आयएसआयने या क्षेत्रावर जो पडदा टाकून ठेवला होता तो आता उठला असून या क्षेत्रातील भीषण वास्तव जगासमोर आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया या सूत्रांनी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)