बारमधील पैसे घेऊन कामगार पळाला
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
बारमधील पैसे घेऊन कामगार पळाला
बारमधील पैसे घेऊन कामगार पळाला
बारमधील पैसे घेऊन कामगार पळालानागपूर : बीअरबारमधील व्यवसायाचे ६९ हजार लंपास करणाऱ्या आरोपीविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमणजितसिंग घेलन (३०) रा. वर्धमाननगर यांचे लघुना ब्लू बार अँड रेस्टॉरेंट आहे. त्यांनी आरोपी पीयूष सरकार रा. पाथर्डी जि. धनबाद (झारखंड) याला कामगार पुरवठा आणि मार्केटिंगच्या कामासाठी ठेवले होते. रमणजितसिंग हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांनी पीयूषला हॉटेलचा धंदा काऊंटरमध्ये ठेव किंवा घरी आजीला नेऊन देण्यास सांगितले. परंतु आरोपीने हॉटेलच्या धंद्यातील ५४ हजार आणि मुख्य कुकचे १५ हजार असे एकूण ६९ हजार रुपये घेऊन पळून गेला.