बाळापूर : येथील वीटभट्टीवर काम करणार्या एका मजुराचा मन नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली. खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील दगडू सोळंके (३५) हा मजूर मंगळवारी सायंकाळी मन नदीत बुडाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील पुलानजीकच्या पात्रात ही घटना घडली. या मजुराचा मृतदेह त्यावेळी मिळून आला नव्हता. शोधमोहीम राबविल्यानंतर बुधवारी दुपारी सोळंकेचा मृतदेह नदीपात्रात सापडला. रोजगारासाठी दगडू हा बाळापूर येथील वीटभीवर कामासाठी आला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर संकट ओढावले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नदीत बुडून मजूर ठार
By admin | Updated: May 15, 2014 19:48 IST