शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयाचा तो गुन्हेगार सध्या करतोय हे काम

By admin | Updated: May 6, 2017 07:07 IST

या क्रूरकृत्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने याआधीच सहिसलामत सुटला होता. हा आरोपी अल्पवयीन असल्याचे

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 5 - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयाने चार आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. मात्र या क्रूरकृत्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने याआधीच सहिसलामत सुटला होता. हा आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात झाली होती. तेथे तीन वर्षांची शिक्षा भोगल्यावर त्याची मुक्तता करणायात आली होती. निर्भया बलात्कार प्रकरणातील हा आरोपीही तितकाच दोषी असल्याने त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र कायद्यातील पळवाटेमुळे तो सहीसलामत सुटला होता. दरम्यान, बालसुधारगृहातील शिक्षा भोगल्यावर त्याला अत्यंत गोपनीय पद्धतीने मुक्त करण्याता आले होते. हा आरोपी 23 वर्षांचा झाला असून, सुरक्षेच्या कारणावरून त्याला भारतात गुप्त ठिकाणी रवाना करण्यात आले होते. आता तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले आहे. मात्र तो कुठे काम करत आहे, याची माहिती मात्र गुप्त ठेवण्यात आली आहे. १६ डिसेंबर, २०१२ च्या रात्री ही दुर्दैवी आणि अत्यंत लज्जीत करणारी घटना घडली होती. शिक्षेवर शिक्कामोर्तब करताना, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर. भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने म्हटले की, या घटनेने संपूर्ण देशभर संतापाची त्सुनामी निर्माण झाली व तो बलात्कार आणि हत्या ही अत्यंत क्रूर व दुर्मीळातील दुर्मीळ घटना होती. जिल्हा न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. हा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानेही योग्य ठरवले.