शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने बिबट्यास घातले कंठस्नान!

By admin | Updated: August 26, 2014 08:47 IST

कमलादेवी नेगी नावाच्या एका ५६ वर्षांच्या महिलेने तिच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याशी कडवी झुंज देत अखेर त्याला ठार केले

रुद्रप्रयाग (उत्तराखंड) : कमलादेवी नेगी नावाच्या एका ५६ वर्षांच्या महिलेने तिच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याशी कडवी झुंज देत अखेर त्याला ठार केले आणि डोंगरी महिलांच्या साहसकथांमध्ये एका नव्या घटनेची भर पडली.वन क्षेत्रपाल डी. एस. रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगावर रोमांच उभी करणारी ही घटना रविवारी सकाळी डेहराडूनच्या जाखोली उपविभागातील सेमकोटी गावात घडली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलादेवी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेली असता झुडपांमागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून अचानक हल्ला केला. एरव्ही बिबट्या दूरवर दिसला तरी इतरांची बोबडी वळते. पण अंगावर चालून आलेल्या बिबट्याशी कमलादेवींनी धीराने झुंज दिली. आपण या हल्ल्यातून वाचत नाही, असे दिसल्यावर त्यांनी शेतात कामासाठी आणलेल्या कुदळ व विळ््याने बिबट्यावर प्रतिहल्ला चढविला. ही झुंज सुमारे १० मिनिटे सुरू होती. अखेर कमलादेवींच्या कुदळीचा एक घाव बिबट्याच्या डोक्यावर बसला व तो जमिनीवर कोसळला.गावचे सरपंच जगदीश नेगी यांनी सांगितले की, थोड्याच वेळात इतर गावकरी तेथे पोहोचले व त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या कमलादेवींना लगेच आरोग्य केंद्रात हलविले. वनविभागास खबर दिल्यावर त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)