शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांविरुद्ध लढणार महिला पोलीस

By admin | Updated: November 7, 2015 01:54 IST

भविष्यात नक्षलवादाविरुद्ध मोहिमेत महिला पोलीस महत्त्वाची भूमिका वठविणार असून नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये त्यांना भूसुरुंग निष्क्रिय करण्यासोबतच जंगलात युद्ध रणनीतीचे

रायपूर : भविष्यात नक्षलवादाविरुद्ध मोहिमेत महिला पोलीस महत्त्वाची भूमिका वठविणार असून नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये त्यांना भूसुरुंग निष्क्रिय करण्यासोबतच जंगलात युद्ध रणनीतीचे धडे देण्यात येत आहेत.येथून सुमारे १५० कि. मी. दूर बस्तरच्या उत्तरेकडील कांकेर जिल्ह्यात असलेल्या शासकीय काऊंटर टेररिझम अ‍ॅण्ड जंगल वॉरफेअर कॉलेजमध्ये (सीटीजेडब्ल्यूसी) सध्या राज्यातील महिला पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे. नक्षल्यांच्या टोळ्यांमध्ये महिला नक्षलवाद्यांची वाढती संख्या लक्षात घेता नक्षलविरोधी मोहिमेत महिला सुरक्षा जवानांची गरज निर्माण झाली आहे. या केंद्रात आतापर्यंत ३०० महिला कमांडो तयार झाले आहेत.प्रशिक्षक प्लाटुन कमांडर नरेंद्र सिंग यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कॉन्स्टेबल स्तरावरील जवानांपासून अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदापर्यंतच्या महिला जवान महाविद्यालयात ४५ दिवसांचा अत्यंत खडतर युद्ध प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. याअंतर्गत विविध पद्धतीने पेरण्यात येणारे आयईडी नष्ट व निष्क्रिय करण्यात त्या विशेष रुची घेत आहेत. लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या सिंग यांना आयईडी मोहिमेचा अनुभव आहे. (वृत्तसंस्था)काय आहे प्रशिक्षणनक्षल्यांच्या घातपातात सुरक्षा दलाचे कमीत कमी नुकसान व्हावे या अनुषंगाने बॉम्ब निष्क्रिय करण्याचे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करताना सिंग यांनी सांगितले की, महिला जवानांना इ.स.२००६ पासूनच यासाठी प्रशिक्षित करण्यात येत असले तरी आयईडीसंदर्भातील कौशल्यात त्या आतापर्यंत फारसा रस घेत नव्हत्या. बहुधा नक्षलविरोधी मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग नसणे हे यामागील मुख्य कारण होते. परंतु गेल्या वर्षभरापासून महिला पोलिसांकडून बॉम्ब नष्ट आणि निष्क्रिय करण्याच्या अतिरिक्त प्रशिक्षणाची मागणी होत होती. नक्षलग्रस्त भागात तैनात असताना संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करण्यास आपण सज्ज असलो पाहिजे, असे त्यांना वाटू लागल्याने त्यांची मानसिकता बदलली आहे. पोलिसांना जंगलयुद्ध आणि गनिमीकाव्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने २००५ साली सीटीजेडब्ल्यूसीची स्थापना करण्यात आली होती. छत्तीसगड तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून नक्षलवादाशी झुंजतो आहे. प्रशिक्षण केंद्रात ४५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर पोलीस नक्षलवाद्यांविरुद्ध मुकाबल्यास सज्ज होतात.सात जिल्हे आणि ४०,००० चौरस कि.मी. भागात पसरलेल्या विशाल बस्तर क्षेत्रात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात आतापर्यंत अनेक जवान मृत्युमुखी पडले असून जखमी होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सुरक्षा दलावर घातपात करून हल्ला करण्याकरिता काही उपकरणे अनेक वर्षे राष्ट्रीय महामार्ग, राज्यातील महत्त्वाचे मार्ग आणि सुरक्षा दलांच्या छावण्यांजवळून पेरून ठेवण्यात येतात.