शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार कंपन्यांच्या संचालक मंडळात महिलांना प्रतिनिधित्व नाही

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

नव्या कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीच्या संचालक मंडळात एका महिलेचा सहभाग कायद्याने बंधनकारक करूनही आजही देशातील दोन हजार कंपन्यांनी आपल्या संचालक

नवी दिल्ली : नव्या कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीच्या संचालक मंडळात एका महिलेचा सहभाग कायद्याने बंधनकारक करूनही आजही देशातील दोन हजार कंपन्यांनी आपल्या संचालक मंडळात महिलेचा समावेश केलेला नसल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत दिली. विशेष म्हणजे यामध्ये सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसेदत दिलेल्या माहितीनुसार, सरकारी कंपन्या आणि भांडवली बाजारात नोंदणीकृत अशा देशातील १७०७ कंपन्यांच्या संचालक मंडळांवर महिला संचालक नाही. तर नोंदणी नसलेल्या ३२९ कंपन्यांच्या संचालक मंडळावर महिलेचा सहभाग नाही. यापैकी १२१ कंपन्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.नव्या कंपनी कायद्यानुसार, सरकारी कंपन्या, भांडवली बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्या आणि नोंदणी नसलेल्या खाजगी कंपन्या यांना त्यांच्या संचालक मंडळावर किमान एका महिलेची संचालकपदी नियुक्ती करणे बंधकारक आहे. या नियमाची अंमलबजावणी व्हावी म्हणून केंद्रीय वित्तमंत्रालयासोबतच सेबी आणि कंपनी खात्याने वेळोवेळी कंपन्यांना महिलांची नेमणूक करण्याबाबत सुचित केले होते. तसेच, ही कार्यवाही पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)असे आहे कारवाईचे स्वरूप- महिला संचालक न नेमणाऱ्या कंपन्यांवरील कारवाईत दोन प्रकार आहेत.- एक एप्रिल ते एक आॅक्टोबर २०१५ या कालावधीत कायद्याची पूर्तता न केलेल्या कंपन्यांवर कंपनीच्या स्वरूपानुसार ५० हजार ते एक लाख ४२ हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.यामध्ये सरकारी कंपन्यांचा समावेश नाही. तसेच, एक आॅक्टोबरपर्यंत दंडाची रक्कम न भरणाऱ्या कंपन्यांच्या दंडाच्या रकमेत प्रति महिना पाच हजार रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे.