महिलेची सतावणूक; शिक्षक, विद्यार्थी अटकेत
By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST
पणजी : महिलेला वॉट्सअँपवरून अश्लील छायाचित्र पाठवून त्रास दिल्याप्रकरणी होंडा-सत्तरी येथील आयटीआयमध्ये शिकवणारा एक शिक्षक व त्याच्या विद्यार्थ्यास पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली.
महिलेची सतावणूक; शिक्षक, विद्यार्थी अटकेत
पणजी : महिलेला वॉट्सअँपवरून अश्लील छायाचित्र पाठवून त्रास दिल्याप्रकरणी होंडा-सत्तरी येथील आयटीआयमध्ये शिकवणारा एक शिक्षक व त्याच्या विद्यार्थ्यास पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली.या शिक्षकाचे शेजारी राहणार्या महिलेशी गेल्या सहा वर्षांपासून पटत नव्हते. त्या महिलेची सतावणूक करण्यास शिक्षकाने आयटीआयमधील प्लंबिंग शाखेच्या विद्यार्थ्यास सांगितले. विद्यार्थ्याने मोबाईलवरून त्या महिलेला वॉट्सअँपद्वारे अश्लील चित्र पाठविले.हा विद्यार्थी पिर्ण-अस्नोडा येथील आहे. त्याने पिसुर्ले येथे राहणार्या त्याच्या मित्राच्या वडिलांच्या नावे सीमकार्ड घेतले होते. पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. (प्रतिनिधी)