शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘नो एन्ट्री’त घुसणाऱ्या मंत्र्याची गाडी महिला पोलिसाने रोखली

By admin | Updated: May 20, 2015 02:33 IST

चुकीच्या मार्गाने प्रवेश करू पाहणारे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांना परत पाठवत कर्तव्यदक्ष महिला अधिकारी काय करू शकतात याची चुणूक दाखविली.

पाटणा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) धाडसी महिला अधिकाऱ्याने मंगळवारी पाटणा विमानतळावर चुकीच्या मार्गाने प्रवेश करू पाहणारे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांना परत पाठवत कर्तव्यदक्ष महिला अधिकारी काय करू शकतात याची चुणूक दाखविली. टीव्ही वाहिन्यांनी लगेच मंत्र्याला ‘नो एन्ट्री’चे वृत प्रसारित करीत या महिला अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला.पाटण्याच्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये यादव बाहेर पडण्याच्या मार्गाने आत शिरले तेव्हा सदर महिला अधिकाऱ्याने त्यांना रोखले. त्यांच्यात कोणता संवाद झाला ते कळले नाही. नंतर ही महिला अधिकारी वॉकीटॉकीवर बोलत असल्याचे टीव्ही वाहिन्यांवर दाखविण्यात आले. या महिला अधिकाऱ्याने वॉकीटॉकीवर बोलणे संपताच मंत्र्याला थेट माघारी पाठविले. त्या महिला अधिकाऱ्याने वरिष्ठांशी त्याबाबत बोलणे झाल्याची माहिती दिली. यादव यांनीही फार वाद न घालता आदेश मानला. एवढेच नव्हे, तर चुकीची कबुली दिली. व्हीआयपींनी अशाप्रकारे प्रवेश करीत पदाचा गैरवापर करणे योग्य आहे काय? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता या मंत्र्याने होय, मी चूक केली असे म्हटले. (वृत्तसंस्था)मी घाईघाईत प्रवेश करीत असताना चुकीने एक्झिट गेटमधून आत शिरलो. त्या महिला अधिकाऱ्याने मला रोखले आणि दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगितले. मी आदेश मानत दुसऱ्या दाराने प्रवेश केला. मी या महिला अधिकाऱ्याशी कोणताही वाद घातलेला नाही. कर्तव्यदक्षतेबद्दल मी त्यांच्या कामाची प्रशंसा केली, असेही यादव यांनी सांगितले. यादव हे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते.