शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्सनल व्हिडीओ लीक होण्याच्या भितीने तरुणीने केली आत्महत्या

By admin | Updated: April 13, 2017 11:28 IST

विद्यापीठात शिकणा-या एका 21 वर्षीय तरुणीने रुप नगर येथील रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 - दिल्ली विद्यापीठात शिकणा-या एका 21 वर्षीय तरुणीने रुप नगर येथील रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराकडून तिला सातत्याने खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी मिळत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. कॉमर्स शाखेत शिकणा-या या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये मृत्यूसाठी प्रियकराला जबाबदार धरले आहे. तिने मॉडेल टाऊन पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रारही दाखल केली होती. पण पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही असा आरोप तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे. 
 
आरोपी वेद प्रकाश विरोधात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बिहार पाटणा येथे राहणार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. ही मुलगी मूळची मध्यप्रदेशची असून शिक्षणासाठी म्हणून ती दिल्लीत आली होती. दिल्लीत आल्यानंतर ती वेद प्रकाशच्या प्रेमात पडली. दोघे लग्न करणार होते. तीनवर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. पण दोघांच्याही कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता. कुटुंबियांशी नाते संबंध तोड आणि बिहारला निघून येण्यासाठी वेद प्रकाश तिच्यावर दबाव टाक होता. पण तिची कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याची इच्छा नव्हती अशी माहिती तपास अधिका-यांनी दिली. 
 
आई-वडिलांचे घर सोडून ये अन्यथा खासगी क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीन अशी धमकी वेद प्रकाशने दिल्याचे तरुणीने चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. या तरुणीने जेव्हा लग्नासाठी  वेद प्रकाशकडे विचारणा सुरु केली तेव्हा त्याने तिचे कॉल घेणे बंद केले. तो तिला टाळू लागला. तुला लग्न करायचे असेल तर आई-वडिल आणि शिक्षण सोडून बिहारला येऊन रहावे लागेल असे त्याने सांगितले. जेव्हा तिने हा प्रस्वात अमान्य केला तेव्हा त्याने दोघांचे खासगी क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली असे पोलिसांनी सांगितले.