शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवरील हल्ला; केंद्राकडून गंभीर दखल

By admin | Updated: February 5, 2016 03:09 IST

टांझानियाच्या महिलेवरील हल्ला आणि तिला निर्वस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला याबाबतचा विस्तृत अहवाल आणि

नवी दिल्ली / बंगळुरू : टांझानियाच्या महिलेवरील हल्ला आणि तिला निर्वस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला याबाबतचा विस्तृत अहवाल आणि दोषींविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करून कर्नाटक सरकारला तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.टांझानियाच्या महिलेवर हल्ला करण्याला कारणीभूत ठरलेली परिस्थिती, या हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांविरुद्ध करण्यात आलेली कारवाई आणि पीडित महिलेच्या संरक्षणासाठी केलेली उपाययोजना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने कर्नाटक सरकारला दिले. बंगळुरू येथे रविवारी रात्री एका कारने महिलेला चिरडून ठार केल्यानंतर संतप्त जमावाने टांझानियाच्या २१ वर्षीय महिलेला कारमधून बाहेर खेचून जबर मारहाण केली आणि तिचे कपडेही फाडले. महिलेला चिरडणाऱ्या कारचा चालक कारसह पसार झाल्यानंतर काही वेळाने ही टांझानियाची महिला आपल्या कारने अपघातस्थळी आली. जमावाने तिला महिलेला चिरडणाऱ्या चालकाचीच मैत्रीण समजून कारमधून बाहेर ओढले आणि मारहाण केली. भाजपने मात्र राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना या घटनेबाबत ते गप्प का आहेत, असा सवाल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला.