शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनविना २० किमी धावली २२ डब्यांची रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:08 IST

‘अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीचे २२ डबे इंजिनविना उलट्या दिशेने तब्बल २० किमीपर्यंत घरंघळत गेल्याची विचित्र घटना शुक्रवारी रात्री ओडिशामधील एका रेल्वे स्टेशनवर घडली.

भुवनेश्वर: ‘अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीचे २२ डबे इंजिनविना उलट्या दिशेने तब्बल २० किमीपर्यंत घरंघळत गेल्याची विचित्र घटना शुक्रवारी रात्री ओडिशामधील एका रेल्वे स्टेशनवर घडली.शुक्रवारी रात्री ‘अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस’मधील या थरारनाट्यामुळे प्रवाशांचे प्राण कंठाशी आले, पण सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. गाडीच्या इंजिनचे शंटिंग करताना निष्काळजीपणा केल्याबद्दल दोन ड्रायव्हरसह सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे पूर्व सीमांत रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.या सुमारे अर्धा तासाच्या थरारनाट्यात प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. ज्या दिशेने आली त्याच दिशेने गाडी पुन्हा उलटी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेकांनी गाडी थांबविण्यासाठी साखळी ओढली. तरीही गाडी थांबली नाही तेव्हा काही तरी गडबड आहे याची जाणीव झाल्यावर प्रवाशांनी देवाचा धावा सुरु केला. परळीतही २० वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यावेळी मालगाडीचे डबे स्टेशनवर उभी असलेल्या एक्स्प्रेसवर आदळून अनेक जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)>स्किड ब्रेक विसरलेएका बाजूचे इंजिन काढून दुसºया बाजूने जोडायचे असते, तेव्हा डब्यांना ‘स्किड ब्रेक’ लावून त्यांना स्थिर करायचे असते. या घटनेत तेच केले नसावे, असा प्राथमिक अंदाज आहे.दगडांद्वारे गाडी थांबविल्यानंतर कसिंगा येथे एक इंजिन पाठविण्यात आले. ते या गाडीला पुन्हा तितलागढ येथे घेऊन आले. दुसºया बाजूला इंजिन जोडून गाडीचा पुढचा प्रवास शनिवारी दुपारी १२.३५ च्या सुमारास सुरू झाला.>कसे घडले हे थरारनाट्य?गुरुवारी सायंकाळी अहमदाबादहून निघालेलीही गाडी १,४६० किमीचे अंतर पार करून शुक्रवारी रात्री ९.३५ च्या सुमारास ओडिशाच्या बोलांगिर जिल्ह्यातील तितलागढ जंक्शन या स्टेशनवर पोहोचली. येथून पुढे बोलांगिरमार्गे पुरीला जाण्यासाठी गाडीला उत्तर दिशेला जावे लागते. त्यासाठी तितलागढ येथे गाडीचे इंजिन काढून दुसºया दिशेने जोडले जाते आणि त्यानंतर, गाडीचा प्रवास आधीच्या उलट्या दिशेनेसुरू होतो. गाडीचे इंजिन दुसºया बाजूने जोडण्यासाठी काढले, परंतु इंजिन वळवून दुसºया दिशेने जोडण्यासाठी आणेपर्यंत इंजिनाविना उभे केलेले २२ डबे ज्या दिशेने गाडी आली होती, त्या दिशेला उतारावरून घरंगळत निघाले.ते अर्धा तास घरंघळत २० किमी गेले.अखेर त्या मार्गावरील केसिंगा स्टेशनजवळ रेल्वे कर्मचाºयांनी रुळांवर मोठे दगड टाकून ही अनियंत्रित गाडी मोठ्या मुश्किलीने थांबविली. गाडी इंजिनविना धावत असताना वाटेतील सर्व रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यातआले होते.