शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर महिन्याभरातच पतीने व्हॉट्स अॅपवरून दिला तलाख

By admin | Updated: October 7, 2015 13:45 IST

लग्नाला एक महिनाही उलटत नाही तोच केरळमधील एका नवविवाहितेला तिच्या पतीने व्हॉट्सअपवरून घटस्फोट दिला.

ऑनलाइन लोकमत

अल्लपुझा, दि. ७ -  पत्नी ही सफरचंदाप्रमाणे असून तिचा आस्वाद मी घेतला आहे, आता पुन्हा तिच्यासोबत राहायचे नाही असे सांगत केरळमध्ये राहणा-या एका नवविवाहीतेला तिच्या पतीने चक्क वॉट्सअॅपव्दारे घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या तीन आठवड्यानंतरच पतीने थेट वॉट्स अॅपव्दारे घटस्फोट दिल्याने मुलीला धक्का बसला असून याप्रकरणी तिने केरळमधील महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.

अल्लपुझा येथे राहणा-या २१ वर्षीय तरुणीचा २७ वर्षीय तरुणाशी मोठ्या थाटामाटात निकाह झाला. लग्नाच्या तीन आठवड्यानंतर तिचा पती दुबईला कामावर परतला. दुबईत गेल्यावर तिने पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यात काहीच बोलणं होत नव्हते. काही दिवसांनी तिला पतीने व्हॉट्स अॅपवर तीन वेळा तलाक लिहून पाठवले. या प्रकाराने नवविवाहीतेला हादराच बसला.

या तरुणीच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले होते. मात्र तरीही तिच्या आईने कष्ट करून थाटामाटात तिचे लग्न लावून दिले. तिची लहान बहिण सध्या १२ वीत शिकते. सोमवारी पिडीत तरुणीने केरळमधील राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. महिला आयोगाने परदेशातील केरळ संघटनांच्या मदतीने पिडीत तरुणीच्या पतीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. काही इस्लामी संघटनांनी व्हॉट्स अॅपवर दिलेल्या घटस्फोटाचे समर्थन केले आहे. तर महिला संघटनांनी व्हॉट्स अॅपवर घटस्फोट देण्याच्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.