शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

कुजबूज--6 जानेवारी सद्गुरू

By admin | Updated: January 8, 2016 02:13 IST

मोतीने केली अडचण

मोतीने केली अडचण
..............
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची उपाध्यक्ष मोती देसाई यांनी मोठीच अडचण केली. फालेरो यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद नको होते; पण फालेरो जर पद सोडून गेले तर आपली अडचण होईल असे मोतींना वाटल्याने त्यांनी फालेरो यांनी पद सोडूच नये, अशी भूमिका घेतली. मोतींनी नुवे, कुंकळ्ळी अशा ठिकाणी काहीजणांना तिकीट देण्याचे आश्वासन दिलेले असावे. फालेरो यांनी प्रदेशाध्यक्षपदी कायम राहावे ही मोतीरावांची इच्छा बरी आहे; पण त्यांनी फालेरो हे नावेलीतून विधानसभा निवडणूक लढवतील असे जाहीर केल्यामुळे फालेरोंची जास्त अडचण झाली. दिल्लीहूनही फालेरोंना फोन आल्याचे कळते. अशा प्रकारे तिकीट जाहीर करता येते का आणि तेही सोनियाजींचे नाव वापरून, असा प्रश्न अनेकांना पडला. कुणीच प्रेसजवळ किंवा मीडियाजवळ बोलायचे नाही, असे मंगळवारीच काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत ठरले होते. मात्र, मोतींनी लगेच मीडियाला पत्रके वाटली, त्याची दखल फालेरो घेणार काय?
दीपकची शिरोडा भेट
.................
कोडार येथे एका हायस्कूलचा मोठा सोहळा पार पडला. कोडार हा गाव शिरोडा मतदारसंघात येतो. म.गो.चे मंत्री दीपक ढवळीकर हे त्या सोहळ्य़ास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ढवळीकर यांनी शिरोड्यातील त्या सोहळ्य़ाला जाऊ नये म्हणून भाजपमधील काहीजणांनी खूप प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी राज्यस्तरावरील काही भाजप पदाधिकारी वावरले; पण आपण मंत्री या नात्याने गोव्यात कुठेही फिरू शकत नाही का, असा प्रश्न दीपकरावांनी काहीजणांना विचारला. ते कोडारच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आले. आता यापुढे पंचवाडी येथील एका कार्यक्रमास ते जाणार आहेत. शिरोड्यातील विविध गावांमधून दीपक ढवळीकर यांना निमंत्रणे कोण देतो, असा प्रश्न काँग्रेसचे नेते सुभाष शिरोडकर यांना देखील पडला आहे. आपण आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत आहोत, असे गेल्या वर्षी सर्वांना सांगणारे भाऊ पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत.
............