शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पासची ढकलगाडी बंद होणार?

By admin | Updated: November 30, 2014 23:59 IST

सर्वांना शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची शिफारस देशातील शिक्षणासंबंधी सर्वोच्च समितीने केली आहे.

नवी दिल्ली : सर्वांना शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची शिफारस देशातील शिक्षणासंबंधी सर्वोच्च समितीने केली आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने राबविलेल्या या धोरणावर चौफेर टीका होऊ लागली होती. पुढील शैक्षणिक सत्रापासून प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात नेण्याचे धोरण संपुष्टात येईल. तिसऱ्या वर्गातील ६० टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गाचे पुस्तकही वाचता येत नसल्याचे धक्कादायक तथ्य समोर आल्याने हे पाऊल उचलले जात आहे. वरच्या वर्गात बढती देण्यात आल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. वक्त्यांनी दहावीची बोर्डाची परीक्षा परत आणण्याची मागणीही केली होती.केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची बैठक संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर होणार असून त्यावेळी अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय कर्नाटकसारख्या काही राज्यांनी याआधीच घेतला आहे.जुनीच परीक्षा पद्धत आणण्याची मागणीही जोर धरू लागली असतानाच सीएबीईने हरियाणाच्या शिक्षणमंत्री गीता बक्कल यांच्या नेतृत्वात आठवीपर्यंत नापास न करण्याच्या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी उपसमिती स्थापन नेमली. या समितीने या धोरणावर फेरविचार करण्याची शिफारस केली असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)