शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार 'वन रँक वन पेन्शन'ची घोषणा?

By admin | Updated: September 5, 2015 10:14 IST

बहुप्रतिक्षित 'वन रँक वन पेन्शन' (ओआरओपी) योजनेसंदर्भात आज केंद्र सरकारतर्फे घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ -  बहुप्रतिक्षित 'वन रँक वन पेन्शन' (ओआरओपी) योजनेसंदर्भात आज केंद्र सरकारतर्फे घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारतर्फे ही योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज दुपारच्या सुमारास महत्वपूर्ण घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा माजी सैनिकांनी दिला आहे.

या योजनेसंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपाच्या तीन दिवसीय समन्वय समितीच्या बैठकीदरम्यान संघातर्फे सरकारला करण्यात आली होती. देशाच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना आंदोलन करायला लावण योग्य नसून या वादावर तत्काळ तोडगा काढायला हवा, असेही संघातर्फे सांगण्यात आले होते. 

एकाच हुद्यावर मात्र वेगवेगळ्या काळात निवृत्त होणा-या सैनिकांना एकच निवृत्ती वेतन दिलं जाव अशी मागणी लष्करी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी केली असून गेल्या ८२ दिवसांपासून ते जंतरमंतर येथे साखळी उपोषण करत आहेत. ही योजना लागू झाल्यासा निवृत्ती वेतनातील मोठी तफावत संपुष्टात येईल. मात्र सरकारने या मुद्यावर कोणताही निर्णय अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने सैनिकांचे उपोषण सुरूच असून विरोधकही सरकारवर टीका करत आहेत.