शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे पाक कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर

By admin | Updated: October 18, 2016 20:22 IST

मी देशभक्त आहे, माझ्यासाठी देश आधी आहे. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं होतं, तेव्हा परिस्थिती वेगळी होती.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १८ - उरी हल्ल्यानंतर मनसेने मल्टिप्लेक्स मालकांना 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित न करण्याची धमकी दिल्यानंतर सिनेमाचा निर्माता करण जोहरने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी तो म्हणाला, मी देशभक्त आहे, माझ्यासाठी देश आधी आहे. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं होतं, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा.

'ए दिल है मुश्किल' चित्रपट तयार करण्यासाठी ३०० भारतीय लोक दिवसरात्र झटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मी शांत का आहे असं विचारलं जात होतं. मात्र मला हेच सांगायचं होतं. देशापेक्षा मोठं काहीही नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान ऐ दिल है मुश्किल सिनेमाचं शूटिंग झालं. मात्र त्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यान शांततेसाठी सरकारचे प्रयत्न सुरु होते. शांततेसाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. मला माझ्या देशभावनेचा आदर होता आणि कायम राहील.

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाक कलाकार असल्यामुळे 'ए दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची तंबी मनसेनी दिली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन करणने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली त्यावर पोलिसांनीही सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत मनसेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांचा अल्टिमेटम देत भारत सोडायला सांगितले होते. यानंतर पाकिस्तान कलाकारांचा सहभाग असलेले बॉलिवूडचे सिनेमे प्रदर्शित करण्यावरही आक्षेप घेत पाक कलाकारांचा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असेही म्हटले होते. तसेच इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युर्स असोसिएशननेही (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घातली आहे. तर नुकतेच, सिनेमा ऑनर्स आणि एक्झिबिटर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा दाखवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.