शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही - नरेंद्र मोदी

By admin | Updated: May 19, 2016 05:51 IST

केंद्र सरकार कोणत्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे ‘नीट’मुळे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली येथे झालेल्या भेटीत दिले

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- केंद्र सरकार कोणत्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे ‘नीट’मुळे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली येथे झालेल्या भेटीत दिले. ‘नीट’प्रश्नी सकारात्मक तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, ‘नीट’चा अभ्यासक्रम, राज्यातील ८0 टक्के विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असल्याने ‘नीट’चा आग्रह यंदा धरल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी किमान २ वर्षे महाराष्ट्रात नीट परीक्षा नको. आवश्यकता भासल्यास केंद्राने अध्यादेश काढावा व सीईटी परीक्षा दोन वर्षे चालू ठेवाव्यात, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. >पक्षाध्यक्ष शाह व गृहमंत्र्यांशी भेटदिल्लीच्या धावत्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेतली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार, राज्यसभेच्या ३ जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची निवड याबाबत चर्चा तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी या भेटीत शाह यांना दिली. त्यानंतर राज्यातील दुष्काळासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे २,५00 कोटींच्या अतिरिक्त रकमेची मागणी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते.नीट परीक्षेला विरोध करणारे खासगी शिक्षण संस्थांचे संचालक राज्याच्या सीईटी परीक्षांचा गैरफायदा घेतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा विकल्या जातात. राज्य सरकारची याबाबत भूमिका काय? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, खासगी व सरकारी शिक्षण संस्थांसाठी महाराष्ट्रात एकच सीईटी असून तसा कायदाच केला आहे.