झोपडप्या ठेवून महापालिका करणार काय?
By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST
पुणे: झोपडपी पुर्नवसन योजनेतंर्गत हिराबागेतील भूखंड खासगी विकसकाला देण्याचा महापालिकेचा निर्णय योग्यच आहे, वर्षानुवर्षे अशा जागांवर झोपडप्याच ठेवून महापालिकेला शहराचे काय करायचे आहे असा प्रश्न धनकवडी येथील महापालिका प्रभाग समितीचे सदस्य ज्ञानेश्वर दारवटकर यांनी विचारला आहे.
झोपडप्या ठेवून महापालिका करणार काय?
पुणे: झोपडपी पुर्नवसन योजनेतंर्गत हिराबागेतील भूखंड खासगी विकसकाला देण्याचा महापालिकेचा निर्णय योग्यच आहे, वर्षानुवर्षे अशा जागांवर झोपडप्याच ठेवून महापालिकेला शहराचे काय करायचे आहे असा प्रश्न धनकवडी येथील महापालिका प्रभाग समितीचे सदस्य ज्ञानेश्वर दारवटकर यांनी विचारला आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी हिराबाग येथील भूखंड झोपडपी पुर्नवसनासाठी खासगी विकसकला देण्याचा ठराव संमत करण्यात आला. सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेस, विरोधातील भाजप सेना यांनी या विषयाचे समर्थन केले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी या ठरावाला विरोध केला. दारवटकर यांनी महापालिकेच्या मालकीचा भूखंड असा खासगी बिल्डरला देण्याचे समर्थन केले आहे. महापालिकेला स्वत:ला अशा भूखडांवर गृहनिर्माण प्रकल्प सुरू करणे शक्य असले तरी तो पुर्ण करणे कधीही शक्य नाही. त्यामुळे या विषयाला विरोध करणार्यांना त्या जागेवर वर्षानुवर्षे झोपडपीच रहावी असे वाटते का असे मत दारवटकर यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)