नवी दिल्ली : यंदा पाऊस कमी होण्याचा फटका तेलबियांना बसणार असून त्यामुळे खाद्यतेलांची आयात वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनामधील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
अल निनोचा फटका भारताला बसत असून त्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे देशातील तेलबियांच्या उत्पादनात घट होणार आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या उत्पादनालाही बसणार आहे. देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी सरकारला खाद्यतेलाची आयात करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सांगितले जाते.
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया(असोचेम)ने याबाबत केलेल्या एका अभ्यासामधून हा निष्कर्ष निघाला असल्याची माहिती सरचिटणीस डी. एस.रावत यांनी दिली. वाढत्या उत्पन्नामुळे देशातील खाद्यतेलाचा वापर सुमारे 15 टक्क्यांनी वाढत असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. देशातील खाद्यतेलाच्या एकूण मागणीपैकी सुमारे निम्मी मागणी ही आयातीमधून पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन 2क्12-13 मध्ये 11.2 अब्ज अमेरिकन डॉलरच्या खाद्यतेलाची आयात केली गेली होती. नंतरच्या वर्षात तेलबियांचे उत्पादन वाढल्याने आयातीचे प्रमाण कमी होऊन 9.3 अब्ज अमेरिकन डॉलरवर आले आहे. चालू वर्षात पुन्हा आयात वाढून 14 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4भारतातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश ही तेलबिया उत्पादक प्रमुख राज्ये आहेत.
4या राज्यांमधील पाऊस सुमारे 15 टक्क्यांनी कमी होणार असल्यामुळे तेलबियांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
4तेलबियांचे उत्पादन घटल्यामुळे खाद्यतेलांचे उत्पादनही कमी होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक प्रमाणात आयात करावी लागणार आहे.
4सोयाबीन,मोहरी, शेंगदाणो, सूर्यफूल,सरसो या भारतातील प्रमुख तेलबिया आहे. याशिवाय तीळ, करडई,खुरासणी आणि एरंडी यापासूनही काही प्रमाणात तेलाची निर्मिती होते.
4तेलबियांना मिळणारी किंमत ही सातत्याने बदलत असते आणि ब:याचदा ती कमी असल्याने शेतकरी तेलबियांच्या उत्पादनाला फारसा उत्सुक नसल्याचे चित्र दिसून येते.