शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

दाऊदला भारतात आणणारच!

By admin | Updated: May 12, 2015 03:14 IST

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे सांगितल्यामुळे विरोधकांचे लक्ष्य बनलेल्या रालोआ सरकारने दाऊद पाकिस्तानमध्येच

नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे सांगितल्यामुळे विरोधकांचे लक्ष्य बनलेल्या रालोआ सरकारने दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याची पक्की बातमी असल्याचे आणि सरकार त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणणार असल्याचे सोमवारी लोकसभेत जाहीर केले.दाऊदबाबत पाकिस्तानवर प्रत्येक स्तरावर दबाव कायम ठेवण्यात येईल असे सांगून गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद हा पाकिस्तानमध्येच असल्याची विश्वसनीय माहिती भारताकडे आहे. दाऊदचा पाकिस्तानी पासपोर्ट आणि पाकिस्तानमधील त्याच्या कथित पत्त्यासह त्याच्याशी संबंधित प्रत्येक माहिती भारतातर्फे वेळोवेळी पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात येत असते. भारतानेच दाऊदविरुद्ध इंटरपोलच्या मार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यामुळे दाऊदचा शोध घ्यावा आणि त्याला भारताच्या हवाली करण्यात यावे, अशी विनंती पाकिस्तानला वारंवार करण्यात येत असते.पाकिस्तानला पुरेसे दस्तऐवज आणि अन्य साक्षीपुरावे सादर करण्यात आल्यानंतरही पाकिस्तान दाऊदला हूडकून काढण्यात आणि कायदेशीर प्रक्रिया प्रारंभ करण्यात अपयशीच ठरलेला आहे, असे नमूद करून राजनाथसिंग पुढे म्हणाले, दाऊद इब्राहिम हा मुंबईत १९९३ मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या संदर्भात भारताला हवा आहे. त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनेही एक विशेष नोटीस जारी केलेली आहे.या संदर्भात कोणतेही पाऊल उचलावे लागले तरी चालेल पण आम्ही दाऊदला भारतात आणूनच दम घेऊ, असे राजनाथसिंग यांनी यावेळी जाहीर केले.गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी गेल्या ५ मे रोजी दाऊदबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी लोकसभेत प्रचंड गदारोळ केला होता. सरकारला दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले होते. आपण सोमवारी दाऊदबाबत निवेदन करणार असल्याचे राजनाथसिंग यांनी शुक्रवारीच सांगितले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)