शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

‘यूपी’ उत्तम प्रदेश होईल; मोदींना विश्वास

By admin | Updated: March 20, 2017 01:00 IST

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला जातीने हजर राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला जातीने हजर राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र नंतर त्यांनी टिष्ट्वटरवर आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा या दोन उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.मोदींनी टिष्ट्वटरवर असेही लिहिले की, हे नवे सरकार युपीला उत्तम प्रदेश बनविण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही व राज्याचा विक्रमी विकास होईल याविषयी मला उदंड विश्वास वाटतो. जनतेचे आशिर्वाद व कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे निवडणुका झालेल्या पाचपैकी चार राज्यांता भाजपाची सरकारे स्थापन झाली. ‘भव्य’ व ‘दिव्य’ भारताच्या उभारणीसाठी आमचे अथक प्रयत्न सुरुच राहतील. जनशक्तीच्या जोरावर एक नवा आणि बदललेला भारत साकार होत आहे, असेही त्यांनी आणखी एका  ट्विटमध्ये म्हटले.मोदी-मुलायम यांची गळाभेट; गुजगोष्टीलखनऊच्या कांशीराम स्मृती उपवन मैदानावर रविवारी सकाळी उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा तासभर चाललेल्या शपथविधी सोहळ््यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांची झालेली गळाभेट हे मोठे आकर्षण ठरले.सर्व मंत्र्यांच्या शपथविधी पार पडल्यावर पंतप्रधान मोदी उठून तेथून बाहेर निघणार तेवढ्यात मुलायम सिंग यांनी त्यांना थांबविले व मोदीही थांबले. दोघांनी परस्परांना आलिंगन दिले. एवढेच नव्हे तर मुलायम सिंग पंतप्रधानांच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे दिसले व मोदींनीही मान हलवून त्यांच्या म्हणण्यास होकार दिल्याचे दिसले. नंतर मोदी बाजूला उभ्या असलेल्या अखिलेश यादव यांच्याकडे वळले व त्यांनी अखिलेशच्या पाठीवर हलकीशी थापही मारली.मोदी आदित्यनाथ यांना भेटले तेव्हा त्यांच्याही दंडावर थोपटून पंतप्रधानांनी त्यांना शाबासकीची थाप दिल्याचे पाहायला मिळाले. पण यादव पिता-पुत्राला भेटताना मोदींच्या चेहऱ्यावर दिसलेले प्रसन्न हास्य इतरांना भेटताना दिसले नव्हते. निवडणूक प्रचारातील कटुता विसरली गेल्याचेच हे द्योतक होते.अविवाहित ‘क्लब’ योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने देशात अविवाहित मुख्यमंत्र्यांची संख्या सहा झाली. तिवेंद्र सिंग रावत (उत्तराखंड), मनोहर लाल खट्टर (हरियाणा), सर्वानंद सोनोवाल (आसाम ), नविन पटनायक (ओडिशा) आणि ममता बॅनर्जी (६२, पश्चिम बंगाल) हे अविवाहित आहेत.अजय सिंह ते सीएम योगी उत्तराखंड मधील गढवाल या भागात ५ जून १९७२ रोजी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव अजय सिंह. गुरू अवैद्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करत होते. तसेच राजकीय कार्यातही ते रस घेऊ लागले. गढवाल विद्यापीठातून त्यांनी बीएस्सीची पदवी मिळवली. पदवीनंतर त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली. नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन ते संन्यासी झाले. हिंदू वाहिनी नावाची संस्था उभारुन त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा विस्तार केला. हिंदू वाहिनी म्हणजे हिंदू युवकांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी गट आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी ते लोकसभेवर निवडून गेले होते. १९९८ रोजी लोकसभेत सर्वात तरुण खासदार होते. तेव्हापासून ते निवडून येत आहेत. आता यूपीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध अनेक गुन्हेही दाखल आहेत. त्यामध्ये दंगे पसरवणे, हत्येचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, चिथावणी देणे, धमकी देणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे.