शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

Tahawwur Rana : २६/११ चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणणार?; दिल्ली-मुंबईत सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:01 IST

Tahawwur Rana : मुंबई हल्ल्याचं प्लॅनिंग हेडली आणि राणा यांच्यात ईमेलद्वारे झाले होते. त्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळाले.

मुंबई -  २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भारताला मोठं यश मिळालं आहे. राणाच्या आत्मसमर्पणसाठी भारतातील अनेक तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत हजर आहेत. तहव्वूर राणावर २००८ च्या मुंबई हल्ल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात १६६ लोकांचा जीव गेला होता. दीर्घ काळापासून भारत तहव्वूर राणाच्या प्रर्त्यापणाची मागणी करत होता. अखेर मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या भेटीला गेले असता या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत अमेरिकेने ही मागणी मान्य केली.

तहव्वूर राणा आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा सदस्य आहे. राणा हा डेविड हेडलीचा खास मानला जात होता. हल्ल्याअगोदर तहव्वूर आणि हेडली यांची अनेकदा बैठक झाली. डेविड हेडलीने अमेरिकन तपास यंत्रणेसमोर तहव्वूरचं नाव घेतले होते. हेडली मुंबई हल्ल्याआधीच भारतात आला होता. त्याने मुंबईतील ताज हॉटेल, लियोपोल्ड कॅफेसह अन्य प्रमुख जागांची रेकी केली होती. त्यानंतर आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याद्वारे प्रशिक्षण दिलेले लष्कर ए तोयबाचे दहशतवादी मुंबईत शिरले आणि त्यांनी ताज हॉटेलसह इतर ठिकाणांवर हल्ले केले.

तहव्वूरने हेडलीसाठी बनावट व्हिसा बनवला होता. दहशतवादी हेडलीला भारतात व्यापारी म्हणून पाठवले होते, परंतु त्याचा खरा हेतू इथं दहशतवादी हल्ला करणे होते. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याबाबत तहव्वूरला आधीच माहिती होती. २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या आरोपपत्रानुसार, २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यापूर्वी मुंबईतील पवई इथल्या हॉटेलमध्ये २ दिवस राणा थांबला होता. ११ नोव्हेंबर २००८ रोजी तहव्वूर राणा भारतात आला, तो २१ नोव्हेंबरपर्यंत इथेच होता. त्यात २ दिवस मुंबईतील पवई भागात थांबला होता. 

दरम्यान, मुंबई हल्ल्याचं प्लॅनिंग हेडली आणि राणा यांच्यात ईमेलद्वारे झाले होते. त्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळाले. हेडलीने राणाकडे पाकिस्तान सैन्याचे मेजर इकबाल यांचा ईमेल आयडी मागितला होता. मेजर इकबाल हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI शी जोडलेला आहे. त्यामुळे २६/११ च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आले. मेजर इकबाल यालाही भारतीय तपास यंत्रणेने तहव्वूर राणा आणि हेडलीसोबत सहआरोपी बनवला आहे. पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर राहिलेल्या भारतातून वॉन्टेड असलेला आरोपी तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसच्या जेलमध्ये बंद आहे. त्याला भारतात आणणार असून त्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला