शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून

By admin | Updated: May 12, 2014 22:59 IST

जयसिंगपुरातील घटना : पती स्वत:हून पोलिसांत हजर

जयसिंगपुरातील घटना : पती स्वत:हून पोलिसांत हजर
जयसिंगपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन डोक्यात लोखंडी सळईने वार करून पत्नीचा निर्घृण खून करून पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होण्याचा प्रकार आज (सोमवार) शहरात घडला.सुजाता ऊर्फ विजया संतोष सावंत (वय ३२, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. इंदिरानगर झोपडप˜ी, जयसिंगपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संतोष रामचंद्र सावंत (३५. रा. नाना पाटील नगर, कोल्हापूर) असे तिच्या पतीचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी : चौदा वर्षांपूर्वी सुजाता हिचा संतोष सावंत याच्याशी विवाह झाला होता. संतोष हा जेसीबी वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यांना ओंकार (१३), प्रणव (१०) अशी दोन मुले आहेत. चालक असल्याने संतोष नेहमी बाहेरगावी असायचा, दरम्यान कुरुंदवाडमधील एका व्यक्तीशी सुजाता हिचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोषला होता. त्यावरुन दोघांत वरचेवर वाद होत होता. सहा महिन्यांपूर्वी सुजाता ही प्रियकरासोबत बेपत्ता झाल्याची तक्रार संतोषने कुरुंदवाड पोलिसांत दिली होती. या घटनेनंतर सुजाता व संतोष यांच्यात समेट झाला होता. तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील इंदिरानगर झोपडप˜ीमधील सोमनाथ जाधव यांच्या घरी तो भाड्याने राहायला आला होता. दरम्यान, काल (रविवार) रात्री संतोष व सुजाता यांच्यात अनैतिक संबंधावरून वाद झाला. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुजाता झोपली असताना संतोषाने चिडून लोखंडी सळीने डोक्यात वार करून तिचा खून केला.
आज सकाळी घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रकाश घारगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक गणेश लोकरे, शाम कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबतची फिर्याद सुजाताची आई मीना बळवंत ताबरे (४६, रा. झारी मशिदीच्या मागे, कुरुंदवाड)हिने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली.
चौकट -
संशयित पोलिसांत हजर
डोक्यात वार केल्यानंतर सुजाता गंभीर जखमी झाली. मोठा रक्तस्राव झाल्याने ती मृत झाली. त्यानंतर पहाटे चार वाजता संतोष घरातून बाहेर पडला. प्रथम कुरुंदवाडला जाण्यासाठी बसस्थानकावर आला होता; मात्र कुरुंदवाडकडे बस नसल्याने त्याने कोल्हापूर गाठले. त्यानंतर सकाळी परत तो कुरुंदवाड पोलिसांत हजर होऊन पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. कुरुंदवाड पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी संशयिताला आणण्यात आले होते. त्याच्या चेहर्‍यावर कोणताही लवलेश नव्हता.