शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीची खांडोळी

By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST

वर्धेतील थरार : कुत्र्यांनी मानवी अवयव पोत्यातून बाहेर काढल्याने गुन्हा उघडकीस

वर्धेतील थरार : कुत्र्यांनी मानवी अवयव पोत्यातून बाहेर काढल्याने गुन्हा उघडकीस
वर्धा : अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीची कुर्‍हाडीने खांडोळी केल्याची खळबळजनक घटना वर्धेत शनिवारी सायंकाळी उघड झाली. तिचे शीर, हात व पाय कापून एका प्लास्टिकच्या पोत्यात बाधून फेकले. कुत्र्यांनी या पोत्यातील मानवी अवयव बाहेर काढल्याने या हत्येला वाचा फुटली. या प्रकरणी मृत पतीला अटक करण्यात आली असून त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगला मोहन वरठी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजनामाता परिसरात काही कुत्र्यांनी मानवी अवयव उचलून आणल्याचे येथील नागरिकांच्या नजरेत पडले. त्याची पाहणी केली असता तो मानवी पाय होता. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांचा शोध सुरू असताना काही अंतरावर आलोडी शिवारात महिलेचा पाय, हात व शीर आढळून आले. शीर प्लास्टिकच्या पिशवीत असल्याचे दिसून आले.
ही महिला कुठली याचा शोध सुरू असताना इंदिरानगर येथील मंगला वरठी नामक महिला शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती तिच्या घरच्यांना देण्यात आली. यावरून तिचा मुलगा घटनास्थळी पोहोचला. महिलेच्या इतर शरीराचा शोध सुरू असताना कारला मार्गावर एका पोत्यात बांधून असलेला तिचे धड आढळले.
मंगलाच्या नातलंगांनी तिची हत्या पती मोहन यानेच केल्याची तक्रार दाखल केली. यात त्यांनीही अनैतिक संबंधाचा उल्लेख केला होता. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या शरीराच्या काही अवयवाचा तपास पोलीस रविवारीही घेत होते. मोहन याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा असताना रविवारी सायंकाळी त्याने हत्येची कबुली दिली. त्याने शुक्रवारी रात्री मंगलाची हत्या केल्याचे सांगितले.
मोहन नेहमी बाहेर राहत असल्याने पत्नीचे कोणासोबत तरी अनैतिक संबध असल्याचा संशय त्याला आला. या कारणावरून या दोघात नेहमीच वाद होत होता. त्यातूनच शुक्रवारी रात्री तिची हत्या केल्याचे पोलिसांनी त्याने सांगितले. (प्रतिनिधी)
------
साडीवरून मुलाने ओळखले आईला
कुत्र्याने आणलेल्या मानवी अवयावरून पोलिसांनी शोध सुरू केला असता त्यांना एक साडी सापडली. ही साडी बेपत्ता असलेल्या मंगला हिच्या मुलाला दाखविताच त्याने ही साडी त्याच्या आईची असल्याचे सांगितले. यानंतर प्लास्टिकच्या थैलीत आढळलेल्या शिरावरून तिची पूर्ण ओळख पटली.