शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पतीनेच पत्नीला दिली आंघोळीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By admin | Updated: January 30, 2017 13:18 IST

लखनौमध्ये पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणा-या विकृत पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 30 - पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणा-या विकृत पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशातील सुरेंद्रनगर येथे. याप्रकरणी शनिवारी पीडित महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. 
 
लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती हुंड्यासाठी छळ करू लागला आणि मागणी पूर्ण न झाल्याने माझे आंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले,  असा आरोप पीडित महिलेने केला आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये या महिलेचा अयोध्यातील एका व्यावसायिकासोबत विवाह झाला. वडिलांनी लग्नासाठी 30 लाख रुपये खर्च करुन लग्नसोहळ्यात कारसहीत महागड्या भेटवस्तूही सासरच्या मंडळींना दिल्याचे महिलेने सांगितले. 
 
मात्र, हुंडालोभी पतीनं लग्नाच्या काही महिन्यानंतर 10 लाख रुपयांची मागणी करत छळ करायला सुरुवात केली. मागणी पूर्ण न झाल्याने या नराधमाने घर सोडण्यासाठी दबाव आणल्याचा पीडित महिलेने आरोप केला. यावेळी नातेवाईकांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले आणि दोघंही पुन्हा एकत्र राहू लागली.  
 
नातेवाईकांनी समजावल्यानंतर सर्व काही ठिक सुरू होते. मात्र काही काळानंतर त्याने पुन्हा वाईट पद्धतीने छळ करायला सुरुवात केली, असे महिलेने पोलिसांनी सांगितले. पतीमध्ये सुधारणा झाल्यानं महिलादेखील सुखावली होती. यावेळी कुकृत्य करण्याचा कट त्याच्या डोक्यात सुरू आहे, याची पुसटशीही शंका महिलेच्या मनात आली नाही. 
 
याचदरम्यान, त्याने बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावून पत्नीचा आंघोळ करताना व्हिडीओ बनवला आणि हा व्हिडीओ व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत 10 लाख रुपयांची मागणी केली. अखेर त्याच्या धमक्यांना कंटाळून पीडितेनं पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
 
हजरतगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नातेवाईकांनी समजावल्यानंतर प्रकरण निवळले होते. याचदरम्यान आरोपी पतीने महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढण्याचा कट रचला. बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.' याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.