चालत्या रेल्वेत पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
आरा(बिहार): बिहारच्या आरा जिल्ांत आज शुक्रवारी एका पतीने पत्नीची चालत्या रेल्वेत गोळ्या झाडून हत्या केली़ तो सध्या फरार आहे़
चालत्या रेल्वेत पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या
आरा(बिहार): बिहारच्या आरा जिल्ह्यांत आज शुक्रवारी एका पतीने पत्नीची चालत्या रेल्वेत गोळ्या झाडून हत्या केली़ तो सध्या फरार आहे़कमलेश चौधरी असे आरोपीचे नाव आहे़ पत्नी रेखा देवी(४०) हिच्यावर त्याने तीन गोळ्या झाडल्या़ घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला़ रेखा देवीने कमलेशविरुद्ध मानसिक व शारीरिक छळाचे प्रकरण दाखल केले होते़ यामुळे तो संतापला होता़