शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपर्यंत नोटाबदली का नाही?

By admin | Updated: March 28, 2017 01:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या नागरिकांना ३१ मार्च २0१७पर्यंत जुन्या नोटा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या नागरिकांना ३१ मार्च २0१७पर्यंत जुन्या नोटा बदलण्याची परवानगी का दिली नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत एक अर्ज यासंदर्भात दाखल झाला होता. रिझर्व्ह बँक कायद्यानुसार, हा प्रश्न माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाही, अशी भूमिका रिझर्व्ह बँकेने त्यावर घेतली.८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी लागू करण्यासाठी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा बदलून दिल्या जातील, असे जाहीर केले होते. नंतर मात्र ३१ मार्चपर्यंत केवळ अनिवासी भारतीयांनाच नोटा बदलून दिल्या जातील, असा निर्णय सरकारने घेतला. अन्य नागरिकांना ३0 डिसेंबरपर्यंतचीच मुदत देण्यात आली. अनिवासी भारतीयांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही एक याचिका दाखल झाली आहे. त्यावर पंतप्रधानांच्या शब्दांपेक्षा कायदा महत्त्वाचा आहे, अशी भूमिका अ‍ॅटर्नी जनरल यांनी सरकारच्या वतीने मांडल्याचे समजते. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेश गांधी यांनी सांगितले की, एखाद्या माहितीला जाहीर करण्यापासून सूट दिलेली असलेली तरी माहिती अधिकार कायद्याच्या कलम ८ (२) अन्वये व्यापक सार्वजनिक हित लक्षात घेऊन ती जाहीर करता येऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)देशाच्या आर्थिक हिताविरुद्ध?माहिती अधिकारात  दाखल झालेल्या अर्जाच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेने  म्हटले की, नोटा बदलून घेण्याची मुदत मर्यादित का करण्यात आली, याची माहिती जाहीर करणे हे देशाच्या आर्थिक हिताच्या विरुद्ध आहे. केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी सुमन रॉय यांनी सांगितले की, या निर्णयामागील कारणे मागणारा प्रश्न माहिती अधिकार कायद्याच्या कलम २(फ)नुसार माहिती अधिकारात येत नाही.