शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांवर बंदी का नको - सर्वोच न्यायालय

By admin | Updated: April 7, 2017 12:39 IST

कायदा हातात घेणा-या गोरक्षकांवर बंदी का घालू नये ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सहा राज्यांना विचारला आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - गोरक्षकांवर बंदी घालण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राजस्थानसह सहा राज्यांना नोटीस बजावली. या राज्यांना तीन आठवडयांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. अल्वर येथे कथित गोरक्षकांनी  पेहलू खान या मुस्लिमाची तस्कर समजून हत्या केली. या हत्येसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारकडून तीन आठवडयांच्या आता उत्तर मागितले आहे. 
 
यासंबंधी पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. अल्वर येथे झालेल्या घटनेवरुन राजकारण तापले आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक झाली आहे. कायदा हातात घेणा-या गोरक्षकांवर बंदी का घालू नये ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सहा राज्यांना विचारला आहे. गोहत्या आणि हिंसाचाराच्या घटनांसंबंधी काँग्रेस नेते शेहझाद पूनावाला यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 
 
अल्वर येथे गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत पेहलू खान यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचाही पूनावाला यांनी जनहित याचिकेत उल्लेख केला आहे. गोरक्षकांवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे गोरक्षकांवर बंदी घालावी अशी पूनावाला यांची मागणी आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये सरकार गोरक्षकांना पाठिशी घालत असल्यामुळे त्यांना बळ मिळत असल्याचा आरोप पूनावाला यांनी केला आहे. सोशल मीडियामधून पसरणा-या अफवांवरही लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.