शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘त्या’ आमदाराला अटक का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 04:08 IST

युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या भाजपाच्या आमदार कुलदीपसिंग सेनगरचा उल्लेख पोलीस महासंचालकांनी ‘माननीय’ असा केल्याने संतापाची लाट उमटली आहे.

लखनऊ : युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या भाजपाच्या आमदार कुलदीपसिंग सेनगरचा उल्लेख पोलीस महासंचालकांनी ‘माननीय’ असा केल्याने संतापाची लाट उमटली आहे. दुसरीकडे सेनगरला अद्याप अटक का केली नाही, असा सवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी आदित्यनाथ सरकारला केला आहे.‘माननीय’ कुलदीपसिंग सेनगर यांना अटक करण्याची वेळ आल्यास पोलीस नव्हे तर सीबीआय करेल, असे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग म्हणाले. त्यांच्यावर आरोप आहे, ते अद्याप दोषी ठरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना माननीय म्हणण्यात काही चूक नाही, असे समर्थनही पोलीस महासंचालकांनी केले. अर्थात त्यांना वाचविण्याचा आमचा हेतू नाही, अशी सारवासारवही त्यांनी नंतर केली. उत्तर प्रदेशचे गृहसचिव अरविंद कुमार उपस्थित होते. ते म्हणाले, उत्तर प्रदेश पोलीस या बलात्कार प्रकरणाचा तपास धिम्या गतीने करीत होते. सेनगरविरोधात बलात्कार प्रकरणी गुरुवारी एफआयआर दाखल करण्यात आला. हे प्रकरण व युवतीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत असताना झालेला मृत्यू यांची चौकशी सीबाआयकडे सोपविण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.>भाजपाला घरचा अहेरबलात्काराचा आरोप असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या प्रवक्त्या दीप्ती भारद्वाज यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे करून घरचा अहेर दिला आहे. उत्तर प्रदेशला वाचवा, असे आवाहनही भारद्वाज यांनी शहा यांना केले आहे. उत्तर प्रदेश सरकारमुळे भाजपाला मान खाली घालावी लागत आहे, असेही भारद्वाज म्हणाल्या.>दलित महिलेची हत्याअमेठी : उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यातील एका गावात २२ वर्षीय दलित महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. बीएच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या या युवतीचा मृतदेह तिच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर आढळून आला. युवतीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Arrestअटक