शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

वडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 02:35 IST

सुशांत सिंह मृत्यू; कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या संदर्भात त्याचे वडील स्वत: कायदेशीर पाठपुरावा करत असताना तुमच्यासारख्या त्रयस्थाने याचिका करण्याची गरज काय? असे विचारत कायदा शाखेच्या एका विद्यार्थ्याने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

सुशांत सिंहचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी सुशांतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद पाटणा पोलिसांकडे केली होती. त्याचा तपास बिहार सरकारच्या विनंतीवरून ‘सीबीआय’ने हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील एक कायदा शाखेचा विद्यार्थी द्विवेंद्र देवतादीन दुबे याने केलेली याचिका न्यायालयापुढे आली. त्यात हा तपास ‘सीबीआय’ किंवा ‘एनअयए’कडे सोपविण्याची विनंती करण्यात आली होती. ही याचिका फेटाळताना सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामासुब्रह्मण्यन यांच्या खंडपीठाने म्हटले की, मृताचे (सुशांत सिंह) वडील या प्रकरणाचा स्वत: पाठपुरावा करत आहेत. तो ते नीटपणे करणार नाहीत, असे मानण्याचे काहीच कारण नाही.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणले की,सुशांत सिंहच्या मृत्यूच्या संदर्भात मुंबईत एक व पाटण्यात एक असे दोन गुन्हे नोंदले गेले आहेत. त्यापैकी पाटण्यातील गुन्ह्याचा तपास बिहार सरकारच्या विनंतीवरून ‘सीबीआय’ने स्वीकारला आहे.रियाची मागणी अनाठायीच्रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात उत्तराचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.च्बिहारमध्ये तिच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्हाही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याची याचिकेतील तिची मागणी अनाठायी, अकाली व कायद्यात न बसणारी असल्याचे बिहार सरकारचे म्हणणे आहे.च्न्यायालयाने ३० जुलै रोजी अशाच मागणीची आणखी एक याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यास सांगितले होते की, तपासातील उणिवांबद्दल तुमच्याकडे काही ठोस माहिती असेल तर मुंबई उच्च न्यायालयाकडे जा.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंग