शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

...मग कमनशीबींना मतदान का करायचे ? - मोदी

By admin | Updated: February 1, 2015 17:54 IST

माझ्या नशीबामुळे देशवासीयांच्या खिशात पैशांची बचत होणार असेल तर मग कमनशीबींना मतदान का करायचे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - मी सत्तेवर आल्यापासून पेट्रोल व डिझेलचे दर सातत्त्याने कमी होत आहेत. मी नशीबवाला असल्याने कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचे विरोधक म्हणतात. पण जर माझ्या नशीबामुळे देशवासीयांच्या खिशात पैशांची बचत होणार असेल तर मग कमनशीबींना मतदान का करायचे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.  तर पंतप्रधानांनी केजरीवाल यांचा कमनशीबी म्हणून उल्लेख करणे हे डर्टी पॉलिटीक्स असून आता दिल्लीकरच यावर प्रत्युत्तर देतील अशी प्रतिक्रिया आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिली आहे. 
रविवारी भर थंडीतही दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत प्रचारसभांचा धडाका लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे प्रचारसभा घेतली. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले होते. आता ते दोघेही दररोज भाजपावर खोटे आरोप करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. टीव्हीवर दिसण्यासाठी पक्ष स्थापन केले जात नाही. सरकार चालवणे ही महत्त्वाची जबाबदारी असून तिथून पळ काढता येत नाही असा चिमटा मोदींनी केजरीवाल यांना काढला. तर गेली अनेक वर्ष गरिबांना गरिब ठेवून राजकारण केले जात आहे असा आरोप करत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. 
 
मोदींनी दिलेल्या आश्वासनांच काय ? - गांधी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील बदरपूर येथे रविवारी प्रचारसभा घेतली. काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु, तरुणांना रोजगार देऊ अशी आश्वासनं मोदींनी दिली होती. या आश्वासनांचे काय झाले असा खोचक सवाल सोनिया गांधी यांनी विचारला. तर काँग्रेसने चांगल्या प्रशासनासाठी केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. मात्र ते जबाबदारी सोडून पळून गेले अशी आठवण त्यांनी करुन दिले. आम आदमी पक्ष दिखाव्याचे राजकारण करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. 
 
मोदी सरकारच्या काळात बलात्कार वाढले - केजरीवाल 
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. २०१३ मध्ये दिल्लीत बलात्काराच्या १,५७१ घटना घडल्या होत्या. तर २०१४ मध्ये हेच प्रमाण २,०६९ पर्यंत पोहोचले असा दावा केजरीवाल यांनी केला. मोदी सरकारच्या काळात बलात्काराच्या घटनेत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून ओबामांच्या सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही आता काढले जात असल्याचे समजते असा आरोपही त्यांनी केला.