शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षण का करावे?

By admin | Updated: May 5, 2015 01:22 IST

माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. ज्याप्रमाणे मनुष्याला आजार ओळखण्यासाठी त्याचे रक्त, लघवी इत्यादी तपासणी करुन पुढील उपचाराची दिशा ठरवली जाते, त्याप्रमाणे मृदा आरोग्याचेही आहे. मातीमध्ये विविध अन्नद्रव्ये घालण्यापूर्वी त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. त्या अहवालानुसारच पुढील कोणते पीक घ्यावयाचे, त्याचप्रमाणे त्यामध्ये कोणती वरखते व भरखते घालावी लागतात त्याचे प्रमाण ठरवता येते. माती परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्लेषण करण्याची जलद आणि शास्त्रीय पद्धती आहे. जमिनीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण काढणे आणि त्यानुसार पिकांना रासायनिक खतांच्या मात्रा देणे हा माती परीक्षणाचाच मुख्य उद्देश आहे. योग्य खत व्यवस्थापन आणि फायदेशीर शेती उत्पादन यासाठी माती परीक्षण हे शेतीचे आवश्यक अंग आहे.

माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. ज्याप्रमाणे मनुष्याला आजार ओळखण्यासाठी त्याचे रक्त, लघवी इत्यादी तपासणी करुन पुढील उपचाराची दिशा ठरवली जाते, त्याप्रमाणे मृदा आरोग्याचेही आहे. मातीमध्ये विविध अन्नद्रव्ये घालण्यापूर्वी त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. त्या अहवालानुसारच पुढील कोणते पीक घ्यावयाचे, त्याचप्रमाणे त्यामध्ये कोणती वरखते व भरखते घालावी लागतात त्याचे प्रमाण ठरवता येते. माती परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्लेषण करण्याची जलद आणि शास्त्रीय पद्धती आहे. जमिनीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण काढणे आणि त्यानुसार पिकांना रासायनिक खतांच्या मात्रा देणे हा माती परीक्षणाचाच मुख्य उद्देश आहे. योग्य खत व्यवस्थापन आणि फायदेशीर शेती उत्पादन यासाठी माती परीक्षण हे शेतीचे आवश्यक अंग आहे.
माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता ठरविणे, शेतजमिनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण काढून त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा देणे सोयीचे होते. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणार्‍या पोषक अन्नद्रव्यांचा समतोल जमिनीत कायम राखून कृत्रिम अन्नद्रव्यांच्या खर्चात अधिक बचत करता येते. माती परीक्षण अहवालाच्या आधारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जमिनीची सुपिकता निर्देशांक ठरवून त्यानुसार शासनास राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी प्रय} करता येतो किंवा विभागवार खतधोरण ठरवता येते.
मातीचा नमुना कसा घ्यावा?
साधारणपणे पिकाची कापणी झाल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी परंतु नांगरटीपूर्वी मातीचा नमुना घ्यावा किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी नमुना घ्यावा. साधारणपणे नमुनाक्षेत्र सहा एकर किंवा कमी असावे. त्यापेक्षा जास्त असल्यास क्षेत्राचे दोन भाग करावेत. माती निवडताना जमिनीतील रंग, सुपिकता, खडकाळपणा, उंचसखलपणा व पाणथळपणा यावरुन जमिनीचे वेगवेगळे विभाग पाडावेत. प्रत्येक विभागातून मातीचा स्वतंत्र नमुना घ्यावा.
पिकानुसारही मातीपरीक्षण करता येते?
हंगामी पीक घ्यावयाचे असेल तर 20 सेंमी खोलीवरची माती घ्यावी. ऊस, कापसासारखी पिके घ्यावयाची असतील तर 30 सेंमी खोलीवरची माती घ्यावी. फळपिके घ्यावयाची असतील तर साधारणपणे एक मीटर खोलीवरची माती घ्यावी.
मातीचा नमुना घेताना झाडाखालची तसेच जनावरे बसलेली जागा निवडू नये. नुकतेच खत, जिप्सम, चुना, गंधक, शेणखत आणि कचरा टाकण्याच्या जागेवरची माती घेऊ नये. दलदलीची, सेंद्रिय पदार्थ जाळलेली, वनस्पतींचे अवशेष असलेली पाण्याच्या पाटाजवळची माती