शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना परदेशी दाढीवाल्यांबद्दल इतके प्रेम का? - ओवैसी

By admin | Updated: January 27, 2017 12:57 IST

अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे देशात हात पसरवून खुल्या मनाने स्वागत करण्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 27 - अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे देशात हात पसरवून खुल्या मनाने स्वागत करण्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.
'पंतप्रधान मोदींना परदेशी दाढीवाल्यांबद्दल इतकं प्रेम आहे, तर हेच प्रेम ते देशातील दाढीवाल्यांबाबत का दाखवत नाही', असे टीकास्त्र ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर सोडले आहे.  उत्तर प्रदेशातील अलिगड येथील निवडणूक प्रचाराच्या भाषणामध्ये त्यांनी हे खरमरीत विधान केले आहे.  
 
अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान राजधानी दिल्लीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले.  यावरुन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 'आम्हीही आपल्या पाहुण्यांचा सन्मान करतो. अर्थात अबूधाबीचे राजपुत्र यांचेही स्वागत योग्य पद्धतीने होणे गरजेचे होते. मात्र यावेळी मोदी पहाटे योगासने करायला विसरले असे वाटत होते.जेव्हा राजपुत्र दिल्लीत आले त्यावेळी हात पसरवून योगा करत त्यांनी त्यांचे स्वागत केले. जर मोदींना परदेशी दाढीवाल्यांबाबत इतके प्रेम आहे, तर हेच प्रेम देशातील दाढीवाल्यांबद्दल का दाखवत नाही', असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. 
यावेळी ओवैसी यांनी आपल्या भाषणामध्ये अतिशय काळजीपूर्वक 'मुस्लिम' शब्द वापरणं टाळलं. कोणताही नेत्याने धर्माच्या आधारे मत मागू नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या पार्श्वभूमी आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी त्यांनी मुस्लिम शब्द आपल्या भाषणात वापरला नाही.  मोदींव्यतिरिक्त ओवैसींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे वडील मुलायम सिंह यांच्यावरही तोफ डागली. या दोघांचा 'छोटे मियाँ, बडे मियाँ' असा उल्लेख करत विकास कामांच्या त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. 'उत्तर प्रदेशात विकास झाल्याचे बडे मियाँ आणि छोटे मियाँ दावा करत आहेत. मात्र विकास केवळ त्यांच्या कुटुंबाचा झाला आहे, सर्वसामान्य जनतेचा नाही', असा आरोप करत ओवैसींनी  यादव पिता-पुत्रांचा 'ड्रामा कंपनी' असा उल्लेख केला.