शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'या'मुळे कोरोनाग्रस्तांमध्ये दिसत नाहीत लक्षणे, अशा लोकांना पटकन होते व्हायरसची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 14:55 IST

या अभ्यासानुसार, संक्रमणानंतर केवळ 14 टक्के लोकांमध्येच अधिक प्रमाणावर अँटीबॉडीज तयार होत असल्याचे आढळून आले. तर 40 टक्के लोकांमध्ये मध्यम प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्त लोकांमध्ये 7 ते 10 दिवसांत अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होतेभारतात केवळ हॉट स्पॉट भागांतच, अशा प्रकारची तपासणी केली जात आहेकोरोनाची लक्षणे दिसने हे संबंधित व्यक्तीचे वय आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवरही अवलंबून असते

नवी दिल्‍ली : कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रॅपिड किट खराब निघाल्या आहेत. त्यांचा उपयोग शरीरात अँटीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी केला जातो. शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजसंदर्भात नुकताच एक रिसर्च रिपोर्ट समोर आला आहे. यात, ज्या लोकांमध्ये कमी प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात, त्यांना पुन्हा कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याचा धोका अधिक वाढतो. तसेच, कोरोनाग्रस्त लोकांमध्ये 7 ते 10 दिवसांत अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते, असेही सांगण्यात आले आहे. अनेकदा लोकांमध्ये याचे प्रमाण एवढे कमी असते, की त्याचा शोधच लागत नाही आणि हीच कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपुढची समस्या आहे.  

या अभ्यासानुसार, संक्रमणानंतर केवळ 14 टक्के लोकांमध्येच अधिक प्रमाणावर अँटीबॉडीज तयार होत असल्याचे आढळून आले आहे. 40 टक्के लोकांमध्ये मध्यम प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या, तर 30 टक्के लोकमध्ये त्या क्वचितच तयार झाल्या आणि त्यांची रोगप्रतिकारशक्तीही अत्यंत कमी होती. अभ्यासकांच्या मते, अंटीबॉडी तयार करण्याची कमी क्षमता असणाऱ्यांमध्ये संक्रमणांची ओळख होणे अवघड आहे. ही माहिती फुदान यूनिव्हर्सिटीच्या संशोधनातून समोर आली आहे.

अँटीबॉडी टेस्टमुळे केवळ एखादी व्यक्ती संक्रमित असू शकते, एवढेच समजते. भारतात सध्या केवळ हॉट स्पॉट भागांतच, अशा प्रकारची तपासणी केली जात आहे. यावरून संबंधित भागात संक्रमित लोकांची संख्या वाढेल, की नाही. एवढेच कळू शकते. जर या तपासणीत, जास्तीत जास्त लोकांमध्ये अँटीबॉडीज कमी तयार होणे अथवा तयार होताना दिसल्या नाही तर, याचा अर्थ तेथील लोक या व्हायरसमुळे संक्रमित होऊ शकतात असा होतो.

कोरोनाची लक्षणे दिसने हे संबंधित व्यक्तीचे वय आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवरही अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीची रोगप्रिकारशक्ती चांगली असेल आणि व्हायरस कमी असेल तर, अशा व्यक्तींमध्ये त्याची लक्षणे दिसणार नाहीत. तेसेच ज्यांना बऱ्याच दिवसांपासून सर्दी-ताप असेल आणि जे कुठले ना कुठले औषधी घेत असतील, तर त्यांच्यातही लक्षणे फार कमीच जाणवतील. या संशोधनातून आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, 20 ते 42 वर्षांच्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. यामुळेच यांच्यात या व्हायरसची लक्षणे कमी प्रमाणात आढळतात. तर वृद्धांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या व्हायरसची लागण चटकन होते. 

विशेष म्हणजे युवकांच्या तुलने वृद्ध आणि मध्यम वयो गटातील लोकांमध्ये अंटीबॉडी वेगने तयार झाल्या आहेत. याचाच अर्थ असाही आहे, की व्हायरसचा हल्ला होतात त्यांच्यात शरीरात वेगाने अंटीबॉडीज बनायला सुरुवात झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल