महिला प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री कोण देणार!
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
-ठोस पावले उचलण्याची गरज : बसने प्रवास करणाऱ्या महिला असुरक्षित
महिला प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री कोण देणार!
-ठोस पावले उचलण्याची गरज : बसने प्रवास करणाऱ्या महिला असुरक्षित -लोकमत जागरनागपूर : ट्रॅव्हल्स बसने प्रवास करणाऱ्या महिला सुरिक्षत आहेत का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. काही ट्रॅव्हल्स कंपन्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा दावा करीत असल्या तरी खात्री कोण देणार? यामुळे महिलांमध्ये असुरक्षेची भावना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील विविध ठिकाणाहून ट्रॅव्हल्स करणाऱ्या महिलांना याबाबत बोलते केले असता, त्यांना हा प्रवास असुरिक्षत वाटत असल्याचे दिसते. अनेकदा त्या जीव मुठीत धरून हा प्रवास करतात. खूपच उशीर झाल्यास काहीजणी प्रवास टाळण्यासाठी कोणाच्या तरी घरी राहणे पसंत करतात. नुकताच ट्रॅव्हल्स बसमध्ये एका महिला वकिलाचा विनयभंग करणाऱ्या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . त्यावर नुसती चर्चा करण्यापेक्षा ठोस पावले उचलणे अधिक गरजेचे असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. . -समोरची व्यक्ती ओळखूनच प्रवासाचे तिकीट द्यावे(फोटो-डीएससी ०५२२) सोनाली जेनेकर म्हणाल्या, आज समाजात पुरु षांचा महिलांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलेला आहे. कित्येक कठोर कायदे बनवूनदेखील राजरोजपणे दिवसाढवळ्या अत्याचार, विनयभंग, लूट इत्यादी गोष्टी घडत आहेत. आज परिस्थिती एवढी भयानक आहे की कोणत्याही परपुरु षावर महिला विश्वास ठेवूच शकत नाही. यामुळे ट्रॅव्हल्सचे तिकीट देताना समोरची व्यक्ती कशी आहे, हे ओळखणारी यंत्रणाच असावी. उदा. दारुडे व इतर व्यसनी लोकांना तिकीट देऊच नये. - लांबचा प्रवास धोकादायकच व्ही. राधिका म्हणाल्या, आपण एकटे असाल आणि लांबचा प्रवास असेल तर तो धोकादायक ठरू शकतो. शहरातील प्रवासाची तेवढी भीती वाटत नाही. परंतु हे थांबायला हवे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. विशेषत: ज्या ट्रॅव्हल्समधून आपण प्रवास करतो त्या ट्रॅव्हल्सने तरी ही जबाबदारी घ्यायला हवी. -महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घ्यावी(फोटो-डीएससी ०५२२)नाज शेख म्हणाल्या, महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घ्यावी. विशेषत: बसचालक आणि कंडक्टर यांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोणी प्रवासी शहाणपणा करीत असेल तर त्याला त्याच ठिकाणी उतरविण्याची हिंमत त्यांच्याकडे असावी. याशिवाय बसच्या आतही सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, महिलांच्या बाजूला महिलांनाच सीट देण्यास प्राथमिकता द्यावी.